Tarun Bharat

भाजप नेत्या खुशबू सुंदर यांच्या कारला भीषण अपघात

ऑनलाईन टीम / चेन्नई : 

तामिळनाडूतील भाजप नेत्या खुशबू सुंदर यांच्या कारला टँकरने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात सुंदर यांच्या घरचा चक्काचूर झाला असून, सुदैवाने या अपघातात त्या बचावल्या. त्यांना कोणतीही इजा झालेली नाही. आज सकाळी तामिळनाडूच्या मेलमैरुवथुर येथे हा अपघात झाला. सुंदर यांनीच ट्विट करून यासंदर्भात माहिती दिली.

सुंदर यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, मेलमैरुवथुर येथून माझी कार उजव्या बाजूच्या लेनमधून जात असताना टँकरने अचानक धडक दिली. टँकरच्या धडकेत कारचा चक्काचूर झाला. मात्र, ईश्वर कृपेने मी या अपघातातून बचावले. तामिळनाडूमधील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाच्या प्रचारासाठी मी जात होते. मी पुढील प्रवास सुरूच ठेवला आहे.

Related Stories

पेगासस संदर्भातील याचिकांवर गुरुवारी सुनावणी

datta jadhav

बेळगावमधील बीएसएफ जवानाचा मृत्यू

Rohit Salunke

सीमेपासून लढाऊ विमाने दूर ठेवा!

Patil_p

चेन्नई सुपरकिंग्स हंगामात चौथ्यांदा पराभूत

Omkar B

दिलासादायक! कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत धारावीत पहिल्यांदाच एकही रुग्ण नाही

Tousif Mujawar

1200 कोटींचे अमली पदार्थ जप्त

Patil_p