Tarun Bharat

भाजप नेत्या सोनाली फोगाट यांच्या घरी चोरी

ऑनलाईन टीम / चंदीगड : 


भारतीय जनता पक्षाची नेत्या आणि बिग बॉस-14 च्या स्पर्धक सोनाली फोगाट यांच्या घरी लाखो रुपयांची चोरी झाली आहे. त्यांच्या हिसार येथील घरुन लाखो रुपयांचे दागिने, रोकड आणि लाइसेन्स बंदूकची चोरी झाली. सोनाली फोगाट यांनी या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. 


तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठून या घटनेतील चोरट्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रकरणाच्या तपासासाठी फिंगर एक्सपर्ट टीमला पाचारण करण्यात आले आहे. त्याशिवाय, पोलिसांनी जवळपासच्या लोकांकडेही चौकशी करण्यास सुरुवात केली आहे. तसेच, सीसीटीव्ही फुटेजही तपासले जात आहेत.


सोनाली फोगाट यांनी दिलेल्या तक्रारी पोलिसांनी सांगितले की, 9 फेब्रुवारीला त्या संतनगर येथील त्यांच्या घराला कुलुप लावून चंडीगडला गेल्या होत्या. जेव्हा त्या सोमवारी 15 फेब्रुवारीला घरी परतल्या तेव्हा त्यांच्या घराचे कुलुप तुटलेले होते. त्यांनी तात्काळ घरात जाऊन पाहिले. त्यांनी त्यांच्या घरातील सामान बघितले तेव्हा त्यांना घरात चोरी झाली असल्याचे कळाले. चोरांनी 10 लाख रुपये रोकड, सोनं आणि चांदीचे दागिने, घड्या आणि लाइसेन्स रिव्हॉल्वर आणि आठ काडतुसे चोरी केली.  

फोगाट यांनी तक्रारीत म्हटले, घरुन बरेच सामान चोरीला गेले आहे आणि त्या घरचे सर्व सामान तपासून एक यादी देतील. त्यांच्या घरी सीसीटीव्ही लावलेले आहेत, पण चोरांनी घरातून डीव्हीआरही गायब केला आहे.

Related Stories

ज्योतिरादित्य सिंधियांनी बदलला इतिहास

Patil_p

मुस्लिमांनी सपावर विश्वास ठेवून मोठी चूक केली : मायावती

Archana Banage

मध्यप्रदेश : काँग्रेस आमदार राहुल सिंह लोधींचा भाजपात प्रवेश

datta jadhav

राष्ट्रीय सुरक्षेशी तडजोडीची आवश्यकता नाही

Amit Kulkarni

दर आठवडय़ाला दौरा करणार ४ मंत्री

Patil_p

सुखबीर बादल, शिअद उमेदवारावर गुन्हा

Patil_p