Tarun Bharat

भाजप महिला मोर्चाच्या कार्यकर्त्या रीना साप्ते, तृप्ती बाणावलीकर यांचा शिवसेना पक्षात प्रवेश

प्रतिनिधी /म्हापसा

म्हापसा येथील भाजप महिला मोर्चाच्या कार्यकर्त्या रीना साप्ते आणि तृप्ती बाणावलीकर यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला. ज्येष्ठ शिवसैनिक आणि माजी विद्यार्थी सेना अध्यक्ष राजेश मराठे यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. यावेळी राज्य प्रमुख जितेश कामत आणि सरचिटणीस मिलिंद गावस उपस्थित होते.

सौ. रीना आणि सौ. तृप्ती या निवृत्त शिक्षिका असून समाजकारणात सक्रिय आहे. सौ. बाणावलीकर या विद्या प्रबोधिनीच्या माजी संस्थापक सदस्य आहेत. त्या गणेश विद्यामंदिर, गणेशपुरीच्या मुख्याध्यापक होत्या. 12 महिला स्वयंसहाय्यता गटाच्या माध्यमातून त्या विविध उपक्रम राबविण्यासाठी कार्यरत आहेत. सौ. साप्ते या विविध हस्तकलेत पारंगत असून महिला सबलीकरणासाठी गरजू महिलांना प्रशिक्षण देण्याचे काम करण्याबरोबरच ऑनलाईन प्रशिक्षण देतात. सौ. साप्ते यांची म्हापसा मतदारसंघ महिला आघाडी संघटकपदी तर सौ. बाणावलीकर यांची सहसंघटकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

शिवसेना पक्षात प्रवेश केल्याने म्हापसा मतदारसंघात पक्ष आखणी बळकट होण्यास मदत होईल. गोव्यात भाजपचे काँग्रेसीकरण झाल्यामुळे मुळ भाजप कार्यकर्ते दुखावले गेले आहेत. ध्येय धोरणे समांतर असल्याने असंख्य भाजप कार्यकर्ते शिवसेनेकडे आकर्षित होत आहेत असे मत शिवसेना राज्य प्रमुख जितेश कामत यांनी व्यक्त केले. आजतागायत म्हापशात खोर्ली, कुचेली आणि गणेशपुरी येथे शिवसेनेतर्फे महिला सबलीकरण वर्ग घेण्यात आले आहेत. महिलांसाठी स्वास्थ्य आणि स्वच्छतेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची माहिती देण्यात आली असून उत्कृष्ट प्रतिसाद मिळत आहे. सौ. साप्ते आणि सौ. तृप्ती म्हापशात विविध ठिकाणी महिला सबलीकरणासाठी कार्यक्रम राबविणार असल्याची माहिती कामत यांनी दिली.

Related Stories

म्हापशात आता 100 टक्के अधिक लक्ष केंद्रीत करणार- उपसभापती जोशुआ डिसोझा

Omkar B

राज्यात ‘किंग मोमो’ची राजवट

Patil_p

विश्व बॅडमिंटन दुहेरीत पहिल्या दहात तनिशा क्रास्टोला मानांकन

Amit Kulkarni

वेगवेगळय़ा दोन अपघातात दोन युवक ठार

Patil_p

बोगमाळोत गोळय़ा झाडून युवकाचा खून

Omkar B

दरदिवशी 300 जण मरण्याची सरकार वाट पाहत आहे काय?

Amit Kulkarni