Tarun Bharat

भाजप सत्तेत आल्यास भूमिपुत्र विधेयक कायद्यात रूपांतरित करेल

गोवा फॉरवर्ड अध्यक्ष विजय सरदेसाई यांचा दावा : फातोर्डा येथे ‘ओपिनियन पोल’ दिवस कार्यक्रम

प्रतिनिधी /मडगाव

गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी रविवारी सांगितले की, भाजप सरकारने गोमंतकीयांचा ‘टॅग’ बिगरगोमंतकीयांना देण्यासाठी ‘भूमिपुत्र अधिकारिणी विधेयक’ आणले होते, जे विरोधकांनी आवाज उठवल्यानंतरच रद्द करण्यात आले. पण भाजपची पुन्हा सत्ता आल्यास हे विधेयक कायद्यात रूपांतरित करून ते गोव्यात गोमंतकीयांनाच अल्पसंख्याक बनवतील, असा दावा सरदेसाई यांनी केला.

सरदेसाई यांनी फातोर्डा येथील ओपिनियन पोल स्क्वेअर येथे नगराध्यक्ष लिंडन पेरेरा, नगरसेवक जॉनी क्रास्टो आणि ज्ये÷ पत्रकार अनिल पै यांच्या उपस्थितीत ओपिनियन पोल दिवस साजरा केला. ‘डॉ. जॅक सिकेरा यांनी आमची अस्मिता जपण्यात आणि गोव्याचे महाराष्ट्रातील विलिनीकरण रोखण्यात मोठी भूमिका बजावली. त्यांच्यासोबत शाबू देसाई, उल्हास बुयांव, रवींद्र केळेकर, ऍड. उदय भेंब्रे, चंद्रकांत केणी आणि इतरांनीही आमच्या गोव्याच्या अस्मितेसाठी लढा दिला. यासाठी आम्हाला विधानसभा संकुलात डॉ. सिकेरा यांचा पुतळा बसवायचा होता, पण भाजपने तो होऊ दिला नाही, असे सरदेसाई म्हणाले.

भाजपने सदर प्रस्ताव फेटाळल्यानंतर गोवा फॉरवर्ड पक्षाने मेरशी येथे डॉ. सिकेरा यांचा पुतळा उभारण्यासाठी पुढाकार घेतला, याकडे त्यांनी लक्ष वेधले. दोडामार्ग पंचायत आणि नगरपालिकेने गोव्याचा भाग होण्यासाठी ठराव घेतले होते. या सावंतवाडी सरकारवर विश्वास ठेवता येणार नाही. कारण गोव्यात आमच्या गोमंतकीयांनाच अल्पसंख्याक बनवण्यासाठी ते कोणत्याही थराला जाऊ शकतात, अशी टीका सरदेसाई यांनी केली. डॉ. सिकेरांसारखे नेते लढले नसते, तर गोवा महाराष्ट्राचा जिल्हा बनला असता. अस्मिता दिनाच्या 55 वर्षांनंतर आज गोव्यात गोमंतकीयवादी सरकार आहे की, सावंतवाडी सरकार आहे असा प्रश्न पडतो, असे ते म्हणाले.

ओपिनियन पोलचा इतिहास समाविष्ट करू दिला नाही

गोवा फॉरवर्ड हा एक प्रादेशिक पक्ष असल्याने आम्हाला आमच्या इतिहासाचे महत्त्व आणि मूल्य माहीत आहे. त्यामुळे मी शालेय अभ्यासक्रमात ओपिनियन पोलचा इतिहास समाविष्ट करण्याचा प्रयत्न केला होता, पण भाजपने  तो करू दिला नाही. गोव्याची अस्मिता जपण्यासाठी ज्यांनी लढा दिला त्यांची ओळख झाली पाहिजे आणि येणाऱया पिढय़ांनी त्यांचा आदर केला पाहिजे. हे आपल्या इतिहासाच्या विषयात शिकवायला हवे. सावंतवाडी सरकारला त्याची किंमत कळणार नाही, असे सरदेसाई पुढे म्हणाले. अनिल पै म्हणाले की, ही निवडणूक म्हणजे आणखी एक ‘ओपिनियन पोल’ असेल आणि गोव्यात दाखल झालेल्या ‘राजकीय पर्यटक पक्षांनी’ दिलेल्या आश्वासनांना बळी न पडता गोव्यातील जनतेने पुन्हा गोव्याचे संरक्षण केले पाहिजे.

Related Stories

काँग्रेसच्या अंतर्गत प्रश्नांशी संबंध नाही

Amit Kulkarni

राष्ट्रीय निबंधलेखन स्पर्धेत अक्षता किनळेकर प्रथम

Amit Kulkarni

गावोगावी बँक असणारे गोवा एकमेव राज्य

Amit Kulkarni

‘या या मया या’ ला मिळणार पुनर्जीवन

Amit Kulkarni

राज्यात फिल्म सिटीसाठी केंद्राने सहकार्य करावे

Patil_p

बुधवारी कोरोनाचे 4 बळी

Omkar B