Tarun Bharat

भाजप सरकारला घरी पाठवा

मगोचे नेते सुदिन ढवळीकर यांचे आवाहन : मगो पक्षातर्फे म्हाळशेला नारळ ठेऊन प्रचाराचा श्रीगणेशा.दिपक फॉर प्रियोळ, केतन फॉर फोंडा नारा,मगो-टीएमसी युतीलाचा मताधिक्य द्या

वार्ताहर /म्हार्दोळ

मगो पक्षाची स्थापना केवळ गोव्यातील गोरगरीब जनतेसाठी सन 1963 साली झालेली आहे. सावंत सरकारच्या ऑनलाईन शिक्षणाचा पहिला फटका गोरगरिब जनतेला बसलेला असून उत्तीर्ण गरिब विद्यार्थ्यांची टक्केवारी 10 टक्यांनी घटलेली आहे. ज्या भाऊसाहेबांनी राज्यात शिक्षण रूजविण्यासाठी शाळा, विद्यालये उभारलेली ती सर्व भाजपा सरकारने पायदळी तुडवलेली आहे. शिक्षणाच्या अधोगतीसाठी जबाबदार भाजपा सरकारला घरी बसवा असे आवाहन मगो-टीएमसी युतीचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार सुदिन ढवळीकर यांनी म्हार्दोळ येथे जाहीर सभेत बोलताना केला.

  मगो पक्षातर्फे विधानसभेच्या निवडणूक प्रचाराची रणधुमाळी सुरू करताना काल रविवारी सायंकाळी म्हार्दोळ येथील देवी म्हाळशेला नारळ अर्पण करून करण्यात आला. त्यानंतर म्हार्दोळ येथील मैदानावर जाहीर सभेला सुदिन ढवळीकर यांनी संबोधित केले. म्हार्दोळ बाजार येथून मगो नेत्यानी असंख्य कार्यकर्त्यासह ढोल ताश्याच्या गजरात देवी म्हाळशेचे दर्शन घेतले. त्यानंतर जाहीर सभेत रूपांतर झाले. सुमारे दीड हजार कार्यकर्ते उपस्थित होते.

  यावेळी व्यासपीठावर मगो पक्षाचे अध्यक्ष दिपक ढवळीकर, फोंडय़ाचे उमेदवार डॉ. केतन भाटीकर, सावर्डेचे उमेदवार बालाजी गावस, मांद्रेचे जीत आरोलकर, पेडणेचे प्रवीण आर्लेकर, शिरोडयाचे उमेदवार संकेत मुळे, कुडचडेसाठी प्रभू, जिल्हा पंचायत सदस्य दामोदर नाईक, केरी पंचायतीचे पंचसदस्य रोहिदास केरकर, केंद्रीय समितीचे पदाधिकारी नारायण सावंत, प्रताप फडते व इतर पदाधिकारी  उपस्थित होते.

भाजपाने स्वतःला हिंदुत्ववादी म्हणताना किती देऊळे उभारली

   यावेळी पुढे बोलताना सुदिन ढवळीकर म्हणाले ज्या भाजपा सरकार मगोच्या कृपेने आज राज्यात रूजून सत्ता भोगीत आहे त्यानी मगो-टीएमसी युतीबाबत अहिंदुत्वावादी असा आरोप करू नये. तपोभूमी ही गोव्यातील सर्वात मोठे शक्तीस्थान असून येथे  होऊ घातलेले रू. 5 कोटीचे काम बंद पाडण्यात स्वतःला हिंदुत्ववादी म्हणणाऱया भाजपा सरकार का करत आहे असा सवाल उपस्थित केला. पोर्तुगीजांनी मोडलेली देऊळे उभारण्याची भाषा मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्या तोंडी शोभत नसून त्यांनी किती देऊळे उभारली याचा हिशोब जाहीररित्या द्यावा असे आव्हान सुदिन ढवळीकर यांनी दिले.

  मुक्तीदिन हिरकमहोत्सवी निधीतून गरिब जनतेची घरबांधणी करा!

 महापुरानंतर मुख्यमंत्र्याने बेघर झालेली सर्व घरे उभारण्याचे आश्वासन हवेत विरलेले आहे. मगो पक्षाच्या पुढारपणाखाली घरे बांधण्याचे काम हाती घेतलेले आहे. मुक्तीदिनाची हिरकमहोत्सवीत मुख्यमंत्री चषकात पैसे उधळण्यापुर्वी गोरगरिब जनतेचा विचार होणे गरजेचे होते. गोमंतकीय मतदारांनी अशा ‘दोंडीबा संतोषी सावंत सरकार’ला अद्दल घडवून येत्या निवडणूकीत भाजपाला एकेरी जागेत समाधान मानण्याची अद्दल घडवावी असे आवाहन केले. रोहिंग्यावर बोलताना ‘त्या’ निर्वासितांना ममता सरकारने आणले नसून सन 1971 साली कॉग्रेस सरकारने आणल्याची सांगितले.

भाजपा एकनिष्ठाचा मगोत प्रवेश

जाहीर सभेत केरीचे पंचसदस्य रोहिदास केरकर व प्रतिक्षा गावडे यांना मगो पक्षात रितसर प्रवेश देण्यात आला. यावेळी बोलताना रोहिदास केरकर म्हणाले की मागील 35 वर्षापासून भाजपासाठी एकनिष्ठ राहिल्यानंतरही आयात केलेल्या उमेदवाराला भाजपा पाठिंबा देत असून आपल्याच निष्ठावंताच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे षडयंत्र प्रियोळ मतदारसंघात होत असल्यामुळे मगो पक्षाला पाठिंबा करत असल्याचे त्यांनी सांगितले.

सावर्डे मतदारसंघातील मगोचे संभाव्य उमेदवार बालाजी गावस यांनी सावंत सरकारने पाच वर्षात स्वयंपुर्ण गोवा आत्मनिर्भर भारतसाठी काय केले ते सांगावे असे आव्हान दिले. हे सरकार केवळ उद्योग बंद पाडण्यात अग्रेसर असल्याचे सांगताना खाण उद्योग, रेती व्यवसाय, शेतकऱयांना जमीनहक्क देण्यात अपयशी अशा सर्व आघाडय़ावर आत्मनिर्भर असलेल्या खाण अवलंबिताना बेकार करण्याची शेकी मिरवण्यात अग्रेसर सावंत सरकार असल्याचे नमूद केले.

  मगो-टीएमसी युतीचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार सुदिन  

दिपक ढवळीक यांनी आपण प्रियोळ मतदारसंघातून विधनासभेची निवडणूक लढविण्याचा ईशारा देताना मगो-टीएमसी युतीची री.. ओढली. आपले सरकार निवडून आल्यास गृहलक्ष्मी कार्ड योजनेअंतर्गत प्रत्येक गृहिणीला रू. 5000 देण्यात येईल. त्यासाठी घरोघरी नावनेंदणीलाही सुरवात झाली असून मगो-टीएमसी ही गोव्यासाठी नवी सकाळ ठरणार असून युतीचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार हे सुदिन ढवळीकर असतील अशी घोषणा केली. मगो नेते डॉ. केतन भाटीकर यांनी आपल्या भाषणात  काहीवेळा हिंदीतून संवादफेक करीत मगो-टीएमसीची झलक दाखविली. तसेच  मगोविरोधी राजकारणात उतरणाऱयानी आपल्या आयटी सेलचा उपयोग बदनामीकारक मजकून पत्रके वाटण्यास वापर केल्यास त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी डॉ. भाटीकर टिम सक्षम असल्याचा ईशारा दिला.

Related Stories

राज्यात कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण 72 टक्के

Omkar B

वेळगे सरपंचपदी महेश गवंडे

Patil_p

कुंकळ्ळीतील लढय़ासंबंधी घेतलेल्या निर्णयाबद्दल मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन

Amit Kulkarni

फर्मागुडी येथे 19 रोजी शिवजयंती उत्सव

Omkar B

आज संपणार उत्कंठा

Amit Kulkarni

बोरी, शिरोडा भागात डेंग्यूचा फैलाव

Amit Kulkarni