Tarun Bharat

भाजप सरकार हिटलर प्रवृत्तीपासून दूर

Advertisements

समाजकल्याण मंत्री श्रीरामलू यांनी माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांच्या ट्विटबद्दल नोंदविली प्रतिक्रिया

प्रतिनिधी / कारवार

भाजप नेतृत्वाखाली सरकारमध्ये हिटलर प्रवृत्तीच्या प्रशासनाने आजअखेर शिरकाव केला नाही आणि भविष्यातही आमचे सरकार हिटलर प्रवृत्तीच्या प्रशासनापासून दूर राहील, अशी प्रतिक्रिया समाजकल्याण मंत्री श्रीरामलू यांनी माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी अलिकडेचे केलेल्या ट्विट बदल नोंदविली. माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारना उद्देशून अयोध्या येथील राममंदिराच्या उभारणीसाठी निधी संकलन करणारे, निधी देणारे आणि न देणाऱयांची घरे निश्चित करीत आहेत, असे समजले आहे. हे कशासाठी करण्यात येत आहे हे समजायला मार्ग नाही. हिटलरच्या राजवटीत नाझी आणि यहुदी यांच्या दरम्यान हिंसाचार होऊन लाखो नागरिकांना जीव गमवावा लागला होता. आमच्या देशातील सुरू असलेल्या घडामोडी कुठे जाऊन पोहोचणार याबद्दल माहिती नाही, असे ट्विट केले आहे.

  मंत्री श्रीरामलू समाजकल्याण खात्याच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी मंगळवारी कारवार दौऱयावर आले होते. बैठकीनंतर बोलताना पत्रकारांनी माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी केलेल्या ट्विटबद्दल छेडले असता ते म्हणाले, राममंदिर उभारणीसाठी निधी देणाऱयांची आणि न देणाऱयांची घरे निश्चित केली जात आहेत. ते सर्वस्वी खोटे आहे. कुमारस्वामींनी आधारहीन ट्विट केले आहे. राममंदिर उभारणीच्या बाबतीत राजकारण नको, असे स्पष्ट करून श्रीरामलू पुढे म्हणाले, भाजप सरकारने यापूर्वीही प्रशासनाच्या बाबतीत हिटलर प्रवृत्तीला थारा दिलेला नाही. कुमारस्वामी यांनी प्रचारावर डोळा ठेऊन अशा प्रकारचे वक्तव्य केले आहे. निधी संकलन स्वयंप्रेरणेने होत आहे. कुमारस्वामी यांच्या मनातही अयोध्या येथे राममंदिर व्हावे, अशी इच्छा आहे. निजदच्या आमदारांसह अल्पसंख्याक समाजातील नागरिकही निधी संकलनासाठी हातभार लावीत आहेत. भविष्यात कुमारस्वामीही राममंदिराच्या उभारणीसाठी योगदान करतील, असा विश्वास त्यांनी पुढे व्यक्त केला.  यावेळी जिल्हा पालकमंत्री शिवराम हेब्बार, आमदार रुपाली नाईक, विधान परिषद सदस्य शांताराम सिद्धी, जि. पं. अध्यक्षा जयश्री मोगेर, जिल्हा पोलीस प्रमुख शिवप्रसाद देवराजू आदी उपस्थित होते.

Related Stories

यंदा कोरोनाच्या संकटामुळे गोकुळ जन्माष्टमी साधेपणाने

Patil_p

अनगोळ येथील करेव्वा देवीची यात्रा उत्साहात

Omkar B

आज बारावीची इंग्रजी विषयाची परीक्षा

Patil_p

‘निसर्ग’चे दावे निकाली काढण्यासाठी डिजिट इन्शुरन्सकडून झिरो-टच दाव्यांची सुविधा

datta jadhav

लॉकडाऊनमुळे कर्नाटक पर्यटन व्यवसायाचे २० हजार कोटींचे नुकसान

Abhijeet Shinde

गायकवाडी येथे अपघातात शिरगुप्पीचा युवक ठार

Patil_p
error: Content is protected !!