Tarun Bharat

भाजी विक्रेत्यावर पोलीसांची कारवाई

Advertisements

सातारा :

शहरातील मोनार्क चौक ते मार्केट यार्ड या रस्त्याच्या दुतर्फा भाजी विक्रेत्यांनी थाट मांडला होता. यामुळे काही दिवसापासून सोशल डिस्टन्सचा फज्जा उडत होता. या मार्गावर कोंडीत वाढ होऊन कोरोनाची धास्ती पळून गेल्याचे दिसून येत होते. तोच गुरूवारी वाहतूक शाखेचे पोलीस निरिक्षक विठ्ठल शेलार यांनी या विक्रेत्यांवर कारवाई केली.

    शहरातील भाजी मंडईत गर्दी होऊन सोशल डिस्टन्स नियमांचे उल्लघंन होईल म्हणून विक्रीवर बंदी घालण्यात आली. या भाजी विक्रेत्यांना रस्त्यालगत बसण्यास परवानगी मिळाली. गेल्या काही दिवसापासून हे विक्रेते मोनार्क चौक ते मार्केट याड या रस्त्यावर दुतर्फा बसत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एक मीटरचे अंतर ठेवून सुरूवातीला हे विक्रेते बसत होते. मात्र या विक्रेत्यांच्या संख्येत वाढ होऊन  नियमांची पायमल्ली होऊ लागली. खरेदीला येणाऱया ग्राहकांच्या संख्येतही वाढ झाली. या मार्गाने वाहनांची दुतर्फा वाहतूक सुरू आहे. तसेच अवजड वाहने या मार्गाने प्रवेश करतात. यामुळ सातत्याने होणारी वाहतूक कोंडी डोकेदुखी झाली होती.

या विक्रेत्यांना पुन्हा नियम लावण्यासाठी शेलार यांनी कडक कारवाई केली. कारवाईच्या भीतीने काही विक्रेत्यांची पळता पळ झाली. भाजीच्या पाटया घेवून काही दुसऱया ठिकाणी गेले. ठराविकच विक्रेत्यांना या मार्गावर बसण्यास परवानगी दिली. यामुळे दिवसभर या कारवाईची चर्चा विक्रेत्यांच्यात होती. गर्दी कमी झाल्याने वाहतूक सूरळीत झाली होती.    

Related Stories

अज्ञात वाहनाच्या धडकेत लोणंद चा युवक ठार

Archana Banage

शाळेतील टीव्ही चोरणारी टोळी गजाआड

datta jadhav

पवारांनी कुठं लंगोट शिवला ते सांगावं

Patil_p

सातारा : वनकर्मचाऱ्यांवर पगारविना आली उपासमारीची वेळ

Archana Banage

म्हसवड पालिकेच्या उपाध्यक्षपदी सविता म्हेत्रे यांची निवड

Patil_p

साताऱयात आदेश उल्लंघनप्रकरणी 15 जणांवर गुन्हा

Patil_p
error: Content is protected !!