Tarun Bharat

भातकांडे स्कूलच्या स्पर्धेचे बक्षीस वितरण

Advertisements

प्रतिनिधी/ बेळगाव

भातकांडे इंग्लिश मेडियम हायस्कूल व रोटरी क्लब ऑफ बेळगाव नॉर्थ यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या आंतरशालेय चित्रकला स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा नुकताच पार पडला. शाळेच्यावतीने प्रतिवर्षी गणेशोत्सव चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. रोटरी क्लब ऑफ बेळगाव नॉर्थच्या अध्यक्षा संगीता ठाकुर, अभयसिंग ठाकुर, मुकुंद महागावकर, इरफान शेक्कळ्ळी व सागर कोळी यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना बक्षीसांचे वितरण करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष मिलिंद भातकांडे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.

शाळेच्या प्राचार्या सुवर्णा खन्नुकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले. स्पर्धेत प्रथम स्वरा चव्हाण, द्वितीय किशन पटेल, तृतीय स्वरांजली एस., चतुर्थ निहाल मांजरेकर यांनी क्रमांक पटकाविले. या स्पर्धेत बेळगाव शहर व परिसरातील 500 हून अधिकाऱयांनी सहभाग घेतला होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्नेहल परमेकर यांनी केले. तर लोबो, स्वप्नील, मोहनसिंग यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले.

Related Stories

बेळगाव-नागपूर विमानसेवा आता 15 एप्रिलपासून

Amit Kulkarni

अवयव दानामुळे तिघांना जीवदान

Rohan_P

नंदगड बाजारात खरेदीसाठी मोठी गर्दी

Amit Kulkarni

एमबीएच्या विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ

Omkar B

मराठा, पीएम, जिजामाता, बालाजी स्पोर्ट्स संघांचे विजय

Amit Kulkarni

शहराचा पारा पोहोचला 35 अंशावर

Omkar B
error: Content is protected !!