Tarun Bharat

भात खरेदी प्रक्रियेबाबत लक्ष घालावे!

केंद्रीयमंत्री नारायण राणे यांना माजी उपसभापती तुळशीदास रावराणे यांचे निवेदन

कणकवली:

शासनाच्या जाचक अटी व जिल्हा मार्केटिंग अधिकारी यांच्या मनमानी कारभारामुळे भात खरेदीची प्रक्रिया कठीण होऊ बसली आहे. या प्रश्नी आपण लक्षग्न घालावे, अशी मागणी केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्याकडे माजी उपसभापती तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तुळशीदास रावराणे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, शासनाच्या जाचक अटी व जिल्हा मार्केटिंग अधिकारी यांच्या मनमानी कारभारामुळे 2021-2022 मध्ये 20,000 क्विंटल भाताची खरेदी होणे कठीण झाले आहे. त्यातच शेतकऱयांना शासनाने सप्टेंबरमध्ये महा ई-पीक हे नोंदणीच्या पोर्टलचा वापर करणे सक्तीचे केले आहे. या पोर्टलद्वारे शिक्षित शेतकरीही पीक नोंदणी करू शकत नाही. तलाठी 12 ते 27 ऑक्टोबरपर्यंत टोकन जमा करून संपावर गेल्यामुळे या भात खरेदीची प्रक्रिया प्रक्रियेला ब्रेक लागला. ग्रामीण भागात असलेल्या नेटवर्क व इंंटरनेट सेवा योग्य नसल्यामुळे व महा ई पीक पोर्टलची माहिती शेतकऱयांना नसल्यामुळे 7/12 वर पीक नोंदी झालेल्या नाहीत. त्यातच मार्केटिंग अधिकारी स्थानिक अडचणी समजून न घेता, मनमानी कारभार करत आहेत. या अडचणींमुळे यंदा जिल्हय़ातील भात पिकांच्या नोंदी अल्प प्रमाणात झालेल्या आहेत. त्यामुळे शासकीय भात खरेदीपासून शेतकरी वंचित राहू शकतो. याबाबत आपण तातडीने लक्ष घालून मार्गदर्शन करावे, अशी विनंती केंद्रीयमंत्री राणे यांच्याकडे रावराणे यांनी केली आहे.

Related Stories

कार – दुचाकी अपघातात युवक – युवती जखमी

Anuja Kudatarkar

तिलारी घाटात एकाच ठिकाणी दोन अपघात ; दोन्हीं गाड्या खोल दरीत कोसळल्या

Anuja Kudatarkar

संपावरील कर्मचाऱयांचे मन वळवा!

Patil_p

कोकणासह राज्यात पुन्हा ‘मुसळधार’ चा इशारा!

Patil_p

दोडामार्गात नऊ दिवसांचे कडक लॉकडाऊन

NIKHIL_N

योगी बना, पण लोभी बनू नका!

Patil_p