Tarun Bharat

भात खाचर जलमय

वार्ताहर/ केळघर

विटा-महाबळेश्वर रस्त्याच्या चार पदरीकरणाचे काम सध्या वेगाने सुरू असून नाले न काढल्यामुळे रस्त्याचे पाणी लगतच्या शेतात जात असल्याने शेतकयांना मोठय़ा नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. या रस्त्याच्या ठेकेदाराच्या मनमानी कारभाराचा फटका परिसरातील शेतकयांना बसत आहे. त्यामुळे खरीप हंगामासाठी सज्ज असलेल्या शेतकयांना मनस्ताप देणाया ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी शेतकरी करत आहेत.

विटा ते महाबळेश्वर या रस्त्याच्या रुंदीकरण व मजबुतीकरण करण्याचे काम जावळी तालुक्यात मेढा, केळघर, व केळघर घाट या परिसरात वेगाने सुरू आहे. हे काम करत असताना बहुतांशी ठिकाणी मोया तसेच रस्त्याची उंची वाढवल्याने व रस्त्याच्या दोन्ही बाजूंना नाले न काढल्याने  रस्त्यालगत असणाया भात खाचरामध्ये रस्त्याचे पाणी घुसत आहे. दोन दिवसांपूर्वी झालेल्या जोरदार पावसाने ही खाचरे पाण्याने तुंबलेल्या  अवस्थेत आहे. खाचरातील पाणी जाण्यास मार्ग नसल्याने काही ठिकाणी भात खाचरांच्या ताली पडलेल्या आहेत.

Related Stories

जिल्हा परिषदेच्या बदली प्रक्रियेस अखेरीस गती

Patil_p

साताऱयात सहा लाखाची घरफोडी

Patil_p

स्फोटाच्या कटात सहभागी डॉक्टरसह तिघे रडारवर

Patil_p

धोका वाढला : नागपूरमध्ये दिवसभरात 3,235 नवे कोरोना रुग्ण; 35 मृत्यू

Tousif Mujawar

बेळगावातील हल्ल्याचे पुण्यात पडसाद; कर्नाटकच्या बसेसला फासलं काळं

datta jadhav

तरुणांनो आजार अंगावर काढू नका

datta jadhav