Tarun Bharat

भारतनगर खासबाग येथील विवाहिता बेपत्ता

शहापूर पोलीस स्थानकात एफआयआर

प्रतिनिधी / बेळगाव

वड्डर छावणी, भारतनगर, पहिला क्रॉस, खासबाग येथील एक विवाहिता गेल्या पाच दिवसांपासून बेपत्ता झाली आहे. यासंबंधी शहापूर पोलीस स्थानकात फिर्याद देण्यात आली आहे. पोलीस तिचा शोध घेत आहेत.

पूजा परशराम जंतीनकट्टी (वय 21) असे तिचे नाव आहे. बुधवारी 8 जुलै रोजी सकाळी 6.30 वाजता घरासमोर झाडलोट करण्यासाठी म्हणून ती घरातून बाहेर पडली होती. नंतर घरी परतली नाही. तिचा पती परशराम याने फिर्याद दिली आहे.

5.5 फूट उंची, गहू वर्ण असे तिचे वर्णन आहे. ती मराठी, कन्नड व कोकणी बोलते. घराबाहेर पडताना तिने आपल्या अंगावर पिवळा टॉप व लाल सलवार परिधान केला होता. वरील वर्णनाच्या विवाहितेविषयी कोणाला माहिती मिळाल्यास 0831-2405244 या क्रमांकावर शहापूर पोलीस स्थानकाशी संपर्क साधावा.

Related Stories

• थर्टीफस्टला तळीरामांनी रिचवले 1 लाख 87 हजार लीटर मद्य

Patil_p

सातारा पालिकेची सर्वसाधारण सभा स्थगित

Patil_p

खडकलाटेत 36 एकर भूखंड लाटले

Amit Kulkarni

दहावी अभ्यासक्रमाबाबतची प्रतीक्षा

Patil_p

प्रवाशांना बसमधून लोंबकळत जाण्याची वेळ

Amit Kulkarni

जगात शांती हवी असेल तर विश्वबंधूत्व विचार उपयोगी

Patil_p