Tarun Bharat

भारतविरोधी द्वेषभावना पाकिस्तानच्या अंगलट

35 यूटय़ूब चॅनेलवर भारताकडून कारवाई

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

भारतविरोधी फुत्कार सोडणाऱया आणि फेक न्यूज पसरवणाऱया पाकिस्तानातील 35 यूटय़ूब चॅनेलवर भारताने कठोर कारवाई केली आहे. सदर यूटय़ूब चॅनेल ब्लॉक करण्यात आल्याचे निवेदन शुक्रवारी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे संयुक्त सचिव विक्रम सहाय यांनी दिले. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने 35 यूटय़ूब चॅनेल, 2 ट्विटर अकाउंट, 2 इन्स्टाग्राम अकाउंट, 2 वेबसाईट आणि एका फेसबुक अकाउंटविरोधात कारवाई करत ते ब्लॉक करण्याचे निर्देश दिले आहेत. सदर सर्व साईट्स पाकिस्तानमधून हाताळले जात असून त्यात भारताविरोधात दुष्प्रचार केला जात असल्याचे निदर्शनात आले होते. या कारवाईसंबंधीचे संकेत दोन दिवसांपूर्वीच माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिले होते.  देशविरोधात अजेंडा राबवणाऱयांवर कारवाई सुरुच ठेवणार असल्याचे त्यांनी म्हटले होते. मागील वषीही अशाच प्रकारची कारवाई केंद्र सरकारने केली होती.

Related Stories

श्रीनगरमध्ये सुरक्षा दल, पोलिसांवर दहशतवादी हल्ला

datta jadhav

मेहबुबा मुफ्तींचा पासपोर्ट अर्ज रद्द

Patil_p

उत्तराखंड : दिवसभरात 398 नवे कोरोना रुग्ण; 10 मृत्यू

Tousif Mujawar

अफगाणिस्तानवर भारत-अमेरिका चर्चा

Patil_p

शरणागतीसाठी अमृतपालकडून अटी

Patil_p

अनियंत्रित ई-बसची 17 वाहनांना धडक; 6 ठार

datta jadhav