नवी दिल्ली : लडाख सीमेवर चीनकडून निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताने त्या देशाला आर्थिक तडाखा देण्याची प्रक्रिया पुढे चालू ठेवली आहे. चीनकडून खरेदी केल्या जाणाऱया दूरसंचार साधनसामग्रीवर आता निर्बंध लादण्यात आले आहेत. भारत दरवषी साधारणत: 50 हजार कोटी रुपयांची दूरसंचार सामग्री चीनकडून खरेदी करतो. या निर्बंधांमुळे हे प्रमाण 70 टक्के कमी होईल, अशी शक्मयता आहे. सर्व सार्वजनिक कंपन्यांना चीनकडून साधनसामग्रीची खरेदी न करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.


previous post
next post