Tarun Bharat

भारताचा चीनवर मोठा विजय

वृत्तसंस्था/ मस्कत

आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या महिलांच्या प्रो लीग हॉकी स्पर्धेत भारतीय महिला हॉकी संघाने विजयी सलामी देताना सोमवारच्या सामन्यात चीनचा 7-1 अशा गोलफरकाने दणदणीत पराभव केला.

Advertisements

या सामन्यात भारतीय संघातील चानूने 47 व्या आणि 52 व्या मिनिटाला असे दोन गोल पेनल्टी स्ट्रोकवर नोंदविले. नवनीत कौरने पाचव्या मिनिटाला, नेहाने 12 व्या मिनिटाला, वंदना कटारियाने 40 व्या, शर्मिला देवीने 48 व्या आणि गुरजीत कौरने 50 व्या मिनिटाला गोल केले. चीनतर्फे एकमेव गोल 43 व्या मिनिटाला झु डेंगने नोंदविला. या विजयामुळे भारतीय महिला हॉकी संघाने स्पर्धेच्या गुणतक्त्यात 3 गुणांसह तिसरे स्थान मिळविले. भारताचा गोलफरक प्लस 6 असा आहे. आता मंगळवारी भारत आणि चीन यांच्यात पुन्हा सामना खेळविला जात आहे.

Related Stories

विश्वनाथन आनंदचा पहिला विजय

Patil_p

अफगाणिस्तानात IPL च्या प्रसारणावर बंदी

datta jadhav

सुपरओव्हरमध्ये न्यूझीलंड पुन्हा पराभूत

Patil_p

‘खेलरत्न’साठी साई प्रणित, श्रीकांत ,कोनेरू हंपीची शिफारस

Amit Kulkarni

बांगलादेश क्रिकेट मंडळावर माजी कर्णधार मोर्तझा नाराज

Patil_p

गुड न्यूज : अनुष्का-विराट आई-बाबा बनणार !

Rohan_P
error: Content is protected !!