वेलिंग्टन : भरगच्च क्रिकेट कार्यक्रम आणि कोव्हिड-19 निर्बंधामुळे भारतीय संघ या वर्षअखेरीस वनडे मालिकेसाठी न्यूझीलंड दौऱयावर जाऊ शकणार नसल्याचे गुरुवारी घोषित केले गेले. हा दौरा पुढील वर्षापर्यंत लांबणीवर टाकला गेला आहे. पूर्वनियोजित रुपरेषेनुसार, भारत-न्यूझीलंड यांच्यात 3 वनडे होणार होते. मात्र, यासाठी 14 दिवस क्वारन्टाईन रहावे लागणार असल्याने हा दौरा लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतला गेला. सध्याच्या स्थितीत न्यूझीलंडचा संघ नोव्हेंबरमध्येच भारत दौऱयावर येणार असून त्यावेळी 2 कसोटी व 3 टी-20 सामने खेळवले जाणार आहेत.

