Tarun Bharat

भारताचा माजी फुटबॉल कर्णधार कार्लटन चॅपमन कालवश

नवी दिल्ली : भारतीय फुटबॉल संघाचा माजी कर्णधार तसेच मध्यफळीतील अनुभवी फुटबॉलपटू कार्लटन चॅपमन यांचे वयाच्या 49 व्या वर्षी बेंगळूरमध्ये हृदयविकाराने निधन झाले.

रविवारी रात्री चॅपमन यांना येथील एका खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार चालू असतानाच सोमवारी सकाळी त्यांचे निधन झाले. भारतीय फुटबॉल क्षेत्रामध्ये क्लबस्तरीय स्पर्धेमध्ये चॅपमन, बायचुंग भुतिया आणि आय.एम.विजयन यांनी 1990 च्या दशकामध्ये  दर्जेदार कामगिरीचे दर्शन घडविले होते. 1995 ते 2001 या कालावधीत चॅपमन यांनी भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व केले. चॅपमनच्या नेतृत्वाखाली भारतीय फुटबॉल संघाने 1997 साली सॅफ चषक फुटबॉल स्पर्धा जिंकली होती. क्लबस्तरीय फुटबॉलमध्ये चॅपमन यांनी इस्ट बंगाल तसेच जेसीटी मिल्स संघाचे प्रतिनिधीत्व केले होते.

1990 च्या प्रारंभी चॅपमन हे टाटा फुटबॉल अकादमीचे सदस्य होते. त्यानंतर म्हणजे 1993 साली ते इस्ट बंगाल संघामध्ये दाखल झाले. 2001 साली चॅपमन यांनी व्यावसायिक फुटबॉल क्षेत्रातून निवृत्ती पत्करली होती. भारतीय फुटबॉल फेडरेशनतर्फे चॅपमन यांना आदरांजली वाहण्यात आली.

Related Stories

पै.पृथ्वीराज पाटीलची सिनियर वर्ल्ड चॅम्पियनशीप कुस्ती स्पर्धेसाठी निवड

Archana Banage

ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅमधील महिलांचे उपांत्य सामने रात्रीच्या सत्रात

Patil_p

नितू, अनामिका उपांत्यपूर्व फेरीत

Patil_p

सर्वोत्तम ऍथलिट्स पुरस्कारासाठी महिला, पुरुषांची यादी जाहीर

Patil_p

ब्रेव्हो सनरायजर्स…

Omkar B

ऑस्ट्रेलियातील मदतनिधी सामन्यात लारा खेळणार

Patil_p
error: Content is protected !!