Tarun Bharat

भारताचा यजमान जॉर्डनवर निसटता विजय

Advertisements

इजिप्तविरुद्ध लढतीनंतर विजयी मालिका कायम, दौऱयातील दुसरा विजय

वृत्तसंस्था / झेरक्वा (जॉर्डन)

जॉर्डनच्या दौऱयावर गेलेल्या भारतीय महिला फुटबॉल संघाने शुक्रवारी येथे झालेल्या मित्रत्वाच्या आंतरराष्ट्रीय फुटबॉल सामन्यात यजमान जॉर्डनचा 1-0 अशा गोलफरकाने निसटता पराभव केला. भारतीय महिला फुटबॉल संघाने विदेशी दौऱयामध्ये हा दुसरा फुटबॉल सामना जिंकला आहे. यापूर्वी झालेल्या पहिल्या सामन्यात भारताने इजिप्तवर मात केली होती.

शुक्रवारच्या सामन्यात दोन्ही संघांनी दर्जेंदार खेळ केला. मध्यंतरापर्यंत उभय संघांना आपले खाते उघडता न आल्याने गोलफलक कोराच राहिला. सामन्यांच्या पूर्वार्धात दोन्ही संघांकडून गोल करण्याच्या अनेक संधी वाया गेल्या. भारताची गोलरक्षक आदिती चौहानची कामगिरी दर्जेदार झाल्याने जॉर्डनला शेवटपर्यंत आपले खाते उघडता आले नाही. या सामन्यातील एकमेव विजयी निर्णयाक गोल आघाडी फळीतील मनिषा कल्याणने नोंदविला. यानंतर जॉर्डनने उर्वरित कालावधीत गोल करण्याचा प्रयत्न केला पण ते यशस्वी ठरू न शकल्याने भारताने हा सामना जिंकला.

Related Stories

इंग्लंडच्या फलंदाज प्रशिक्षकपदी ट्रॉट

Patil_p

उरुग्वेचा बोलिव्हियावर विजय, पराग्वेही विजयी

Amit Kulkarni

भारत-ऑस्ट्रेलिया हॉकी कसोटी आज

Patil_p

होबार्ट हरिकेन्सशी जॉर्डन थॉम्पसन करारबद्ध

Amit Kulkarni

पदक विजेत्या बॅडमिंटनपटूंसाठी बीएआयकडून बक्षिसाची घोषणा

Patil_p

मास्टर ब्लास्टर सचिनचा उद्या बर्थ डे : कोरोना संकटामुळे सेलिब्रेशन न करण्याचा निर्णय 

prashant_c
error: Content is protected !!