Tarun Bharat

भारताची लोकसंख्या एक अब्ज ३०० कोटी- इम्रान खान

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली

आपल्या बेताल व्यक्तव्याने चर्चेत असणारे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पुन्हा एकदा तेच सुर आळवत भारताच्या लोकसंख्येवर अजब वक्तव्य केले आहे. इम्रान खान यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना भारताची लोकसंख्या १ अब्ज ३०० कोटी असल्याचे म्हटले आहे. २०१९ मध्ये ही त्यांनी जपान आणि जर्मनी हे देश शेजारी असल्याचे म्हटले होते. यामुळे खान यांचे केवळ भुगोलच नाही तर गणित ही कच्चे असल्याचे म्हटलं जात आहे.

इम्रान खान यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये इम्रान खान यांनी भारताची लोकसंख्या १ अब्ज ३०० कोटी असल्याचे म्हटले आहे. क्रिकेटचा संदर्भ देत, खान असे म्हणाले की, “क्रिकेटमध्ये दोन विश्वचषक आहेत. एकदिवसीय क्रिकेटचा आणि दुसरा कसोटी क्रिकेटचा. ४० ते ५० लाखांच्या लोकसंख्येने भारताला, ज्यांची लोकसंख्या १ अब्ज ३०० कोटी आहे, त्यांना कसोटी क्रिकेटमध्ये हरवले.” यावरुनच त्यांची अवास्तव मांडणी नेटकऱ्यांच्या ही लक्षात आली आहे. इम्रान खान आणि त्यांच्या मंत्र्यांनी ही यापुर्वी अनेकदा अशी विधाने करत पाकिस्तानला लाजेने मान खाली घालायला लावली आहे.

Related Stories

पीडीपी प्रमुख मेहबूबा मुफ्ती स्थानबद्ध

Patil_p

जपानला मिळाला नवा पंतप्रधान

Patil_p

कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांनी वापरलेले साहित्य रस्त्यावर, हातकणंगलेजवळील प्रकाराने संताप

Archana Banage

”शिखांच्या पगडीला विरोध नाही मग हिजाबला का ?”

Abhijeet Khandekar

माफी न मागण्यावर प्रशांत भूषण ठाम

Patil_p

दुसऱ्याच्या भूमीत घुसून अद्दल घडवण्यास सज्ज

Patil_p