Tarun Bharat

भारताचे आणखी तीन धावपटू ऑलिंपिकसाठी पात्र

वृत्त संस्था/ रांची

2021 टोकियो ऑलिंपिक स्पर्धेसाठी भारताचे आणखी तीन धावपटू पात्र ठरले आहेत. कोरोनामुळे जवळपास 11 महिन्यांच्या कालावधीनंतर येथे घेण्यात आलेल्या पहिल्या राष्ट्रीय खुल्या चालण्याच्या स्पर्धेमध्ये शनिवारी भारताच्या संदीप कुमार आणि प्रियांका गोस्वामी यांनी अनुक्रमे पुरूष आणि महिलांच्या 20 कि.मी. पल्ल्याच्या क्रीडाप्रकारात नवे राष्ट्रीय विक्रम नोंदवित ऑलिंपिकचे तिकीट आरक्षित केले आहे. टोकियो ऑलिंपिक स्पर्धेसाठी पात्र ठरणाऱया भारताचा राहुल हा तिसरा धावपटू आहे.

कोरोना महामारी समस्येमुळे 2020 सालातील संपूर्ण ऍथलेटिक्स हंगाम वाया गेला होता. या समस्येनंतर पहिलीच राष्ट्रीय स्पर्धा येथे घेतली जात आहे. येत्या जुलैमध्ये होणाऱया टोकियो ऑलिंपिक स्पर्धेसाठी भारताचे एकूण पाच धावपटू पात्र ठरले आहेत. पुरूषांच्या 20 कि.मी. पल्ल्याच्या चालण्याच्या शर्यतीत के.टी इरफान तसेच भावना जाट (20 कि.मी. महिलांच्या चालण्याच्या शर्यतीत) त्यांनी यापूर्वी आपली पात्रता सिद्ध केली आहे.

शनिवारी येथे झालेल्या पुरूषांच्या 20 कि.मी. चालण्याच्या शर्यतीत संदीप कुमारने 1 तास, 20 मिनिटे आणि16 सेकंदाचा अवधी घेत पहिल्या स्थानासह नवा राष्ट्रीय विक्रम नोंदविला. महिलांच्या 20 कि.मी. चालण्याच्या शर्यतीत प्रियांका गोस्वामीने 1 तास, 28 मिनिटे 45 सेकंदाचा अवधी घेत नव्या राष्ट्रीय विक्रमासह पहिले स्थान मिळविले. पुरूषांच्या 20 कि.मी. चालण्याच्या अ गटातील शर्यतीमध्ये राहुलने 1 तास, 20 मिनिटे आणि 26 सेकंदाचा अवधी घेत ऑलिंपिकमधील आपला प्रवेश निश्चित केला.

ऑलिंपिक स्पर्धेसाठी पुरूष आणि महिलांच्या 20 कि.मी. चालण्याच्या शर्यतीत पात्रतेची मर्यादा अनुक्रमे 1 तास, 21 मिनिटे आणि 1 तास, 31 मिनिटे अशी होती. 2016 च्या रिओ ऑलिंपिक स्पर्धेत भारताच्या संदीप कुमारने 50 कि.मी. चालण्याच्या शर्यतीत आपला सहभाग दर्शविला होता. गेल्यावर्षी झालेल्या महिलांच्या 20 कि.मी. पल्ल्याच्या चालण्याच्या शर्यतीत भावना जाटने आपली ऑलिंपिकसाठी पात्रता सिद्ध केली होती.

आता टोकियो ऑलिंपिक स्पर्धेत भारताचे पाच धावपटू, भालाफेक ऍथलीट निरज चोप्रा आणि शिवपाल सिंग, 3000 मी. स्टीपलचेसर अविनाश साबळे आणि 4ƒ400 मी. मिश्र रिले प्रकारात भारताचे धावपटू सहभागी होणार आहेत.

Related Stories

हॉकी संघाचे प्रमुख प्रशिक्षक रीड यांचा राजीनामा

Patil_p

‘स्काय डायव्हिंग’ने जर्सीचे ‘रॉयल’ अनावरण

Patil_p

पीसीबीच्या हॉल ऑफ फेमचे उद्घाटन लवकरच

Patil_p

ब्राझीलच्या दमदार विजयात रिचर्लिसनची हॅट्ट्रिक

Amit Kulkarni

डिसेंबरमध्ये लंका प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा

Patil_p

राष्ट्रीय शिबिरात मनिका बात्राचा सहभाग नाही

Patil_p