Tarun Bharat

भारताचे सहा मुष्टियोद्धे अंतिम फेरीत

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

स्पेनमधील कॅस्टेलिनो येथे सुरू असलेल्या 35 व्या बॉक्सम आंतरराष्ट्रीय मुष्टियुद्ध स्पर्धेत भारताच्या सहा मुष्टियोद्धय़ांनी अंतिम फेरी गाठत किमान रौप्यपदक निश्चित केले आहे. त्यात मनीष कौशिक (63 किलो गट) व विकास कृष्णन (69 किलो गट) यांचा समावेश आहे. महिलांमध्ये मेरी कोमला कांस्यपदक मिळाले.

अमेरिकेतील व्यावसायिक करार पूर्ण करून परतलेल्या विकासने कझाकच्या अल्बायखान झुस्सुपोव्हचा तर मनीषने फ्रान्सच्या लुनेस हमरोवीचा पराभव केला. दोघांनीही आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर 3-2 याच गुणफरकाने विजय मिळविला. याशिवाय मोहम्मद हुसामुद्दिनने (57 किलो गट) अंतिम फेरी गाठताना पनामाच्या ओरलँडो मार्टिनेझवर 4-1 अशी मात केली. 81 किलो वजन गटात सुमित सांगवानने फ्रान्सच्या राफेल मोनीचा 5-0, 91 किलोवरील गटात सतीश कुमारने लिथुआनियाच्या जोनास जॅझेव्हिसियसला 4-1 असे नमवित आगेकूच केली तर 75 किलो वजन गटात आशियाई रौप्यजेत्या आशिष कुमारने रोमानियाच्या दुमित्रू क्हिकॉलचा 4-1 असा पराभव केला.

 महिला विभागात सिमरनजित कौर (60 किलो गट), पूजा रानी (75 किलो), आंतरराष्ट्रीय पदार्पण करणारी जस्मिन (57 किलो) यांनी अंतिम फेरी गाठली. मात्र सहा वेळची वर्ल्ड चॅम्पियन मेरी कोमला 51 किलो वजन गटात कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. जस्मिनने इटलीच्या सिरिन चराबीचा, सिमरनजितने प्युर्टोरिकोच्या किरिया तापियाचा पराभव केला. दोघीनाही या लढतीत काही गुण गमवावे लागले. मात्र पूजा रानीने पनामाच्या अथेयना बायलॉनवर पूर्ण वर्चस्व राखत एकतर्फी विजय मिळविला. मेरी कोमला मात्र अमेरिकेच्या व्हर्जिनिया फुक्सकडून पराभव पत्करावा लागल्याने कांस्यपदक मिळाले. व्हर्जिनियाने प्रभावी फटके मारले नसतानाही काही वेळा पंचांनी तिला गुण बहाल केले.

Related Stories

साखळी फेरीअखेर टॉप-2 मध्ये राहण्याचे गुजरातचे लक्ष्य

Patil_p

सांगली : संजनाची जागतिक कुमारी कुस्ती स्पर्धेसाठी निवड

Archana Banage

रिओ स्पर्धेतून पोट्रोची माघार

Patil_p

भारतीय महिला संघाचा सप्टेंबरमध्ये ऑस्ट्रेलिया दौरा

Patil_p

हाशिम आमला निवृत्त

Amit Kulkarni

पराभवाची मालिका खंडित करण्याचे दिल्ली-बेंगळूरचे ध्येय

Patil_p