Tarun Bharat

भारताच्या 345 धावांना न्यूझीलंडचे चोख प्रत्युत्तर

Advertisements

श्रेयस अय्यर पदार्पणात शतक झळकावणारा 16 वा भारतीय, दुसऱया दिवसअखेर न्यूझीलंड बिनबाद 129

कानपूर / वृत्तसंस्था

टीम साऊदीच्या (5-69) भेदक स्पेलमुळे न्यूझीलंडने भारताचा पहिला डाव सर्वबाद 345 धावांवर गुंडाळला आणि त्यानंतर दिवसअखेर बिनबाद 129 धावांची दमदार सुरुवात करत यजमान संघाला चोख प्रत्युत्तर देखील दिले. विल यंग (12 चौकारांसह 75) व टॉम लॅथम (4 चौकारांसह 50) यांनी भारतीय गोलंदाजी पुरती निष्प्रभ ठरवली. भारतासाठी निराशाजनक ठरलेल्या या दिवसाच्या खेळात श्रेयस अय्यरचे खणखणीत शतक, ही एकमेव दिलासादायक बाब ठरली. श्रेयस अय्यर मायभूमीत पदार्पणाच्या कसोटीत शतक झळकावणारा 16 वा फलंदाज ठरला. अय्यरने 171 चेंडूत 105 धावांचे योगदान दिले.

आपली 80 वी कसोटी खेळत असलेल्या साऊदीने या सर्वोच्च क्रिकेट प्रकारात डावात 5 बळी घेण्याची ही 13 वेळ ठरली. त्याच्या भेदक गोलंदाजीमुळेच न्यूझीलंडने 4 बाद 258 वरुन डावाला पुढे सुरुवात करणाऱया भारताला सर्वबाद 345 धावांवर रोखून धरले.

सकाळच्या सत्रात श्रेयस अय्यर मायभूमीत शतक झळकावणारा भारताचा 16 वा फलंदाज ठरला. मात्र, रविचंद्रन अश्विनचा (56 चेंडूत 38) अपवाद वगळता अन्य भारतीय फलंदाज सपशेल अपयशी ठरले. अय्यर-अश्विनच्या लक्षवेधी योगदानामुळेच भारताला 350 धावांच्या उंबरठय़ापर्यंत पोहोचता आले. इतका अपवाद वगळता मधल्या फळीतील फलंदाजांचे अपयश मात्र बरेच चिंतेचे ठरले. एकाच एण्डकडून 10 पेक्षा अधिक षटके टाकत साऊदीने भारतीय फलंदाजांना चांगलेच जेरीस आणले.

अय्यरसाठी स्वप्नवत शतक

तत्पूर्वी, 75 धावांवरुन डावाला पुढे सुरुवात करणाऱया श्रेयस अय्यरने माजी दिग्गज फलंदाज गुंडाप्पा विश्वनाथ यांच्या पावलावर पाऊल टाकत कानपूरच्या मैदानावर शतक झळकावण्याचा पराक्रम साध्य केला. साऊदीने रविंद्र जडेजाला दिवसभरात पहिली धाव घेण्यापूर्वीच बाद केले आणि वृद्धिमान साहा, अक्षर पटेल देखील बाहेर जाणाऱया चेंडूवरच बाद झाले. साहा क्रीझवर आल्यानंतर तळाची लाईनअप सुरु झाल्याचे संकेत मिळाले आणि अय्यरने लागोपाठ चौकार मारण्याचा सिलसिला सुरु केला. काईल जेमिसनला (23.2-6-85-3) थर्डमॅनच्या दिशेने कव्हर ड्राईव्हचा खेचलेला फटका अय्यरला 96 धावांवर घेऊन गेला. त्याने जेमिसनलाच दुहेरी धावांसाठी फटकावत पदार्पणातील स्वप्नवत शतक साजरे केले.

अय्यरच्या शतकी खेळीत 13 चौकार व 2 षटकारांचा समावेश राहिला. क्रीझवर टिकून राहण्यापेक्षाही आक्रमक फटकेबाजीवर भर देणाऱया अय्यरची खेळी अखेर साऊदीने संपुष्टात आणली. एका स्लोअर वनवर ड्राईव्ह मारण्याच्या प्रयत्नात कव्हरमधील विल यंगकडे झेल देत अय्यर तंबूत परतला.

किवीज सलामीवीरांची फटकेबाजी

दुसऱया सत्रापासून ग्रीन पार्कची खेळपट्टी दुसऱया दिवशी फलंदाजीसाठी अधिक पोषक ठरत राहिली. पहिल्या दिवसाप्रमाणे चेंडू अचानक उसळून वर येण्याचे प्रमाणही कमी झाले आणि न्यूझीलंडच्या सलामीवीरांनी याचा पुरेपूर लाभ घेतला. स्लो टर्न असल्याने लॅथम व यंग यांनी प्रंटफूटवर येत फिरकीपटूंना निष्प्रभ केले आणि गरजेप्रमाणे बॅकफूटवर जात विकेटच्या दोन्ही बाजूंनी फटकेबाजीवर भर दिला. यामुळे जडेजा (14-4-28-0) व अश्विन (17-5-38-0) हे भारताचे दोन्ही अव्वल फिरकी गोलंदाज पूर्ण निष्प्रभ ठरले. अक्षर पटेलकडून (10-1-26-0) देखील फारसा प्रभावी मारा झाला नाही.

धावफलक

भारत पहिला डाव ः मयांक अगरवाल झे. ब्लंडेल, गो. जेमिसन 13 (28 चेंडूत 2 चौकार), शुभमन गिल त्रि. गो. जेमिसन 52 (93 चेंडूत 5 चौकार, 1 षटकार), चेतेश्वर पुजारा झे. ब्लंडेल, गो. साऊदी 26 (88 चेंडूत 2 चौकार), अजिंक्य रहाणे त्रि. गो. जेमिसन 35 (63 चेंडूत 6 चौकार), श्रेयस अय्यर झे. यंग, गो. साऊदी 105 (171 चेंडूत 13 चौकार, 2 षटकार), रविंद्र जडेजा त्रि. गो. साऊदी 50 (112 चेंडूत 6 चौकार), वृद्धिमान साहा झे. ब्लंडेल, गो. साऊदी 1 (12 चेंडू), रविचंद्रन अश्विन त्रि. गो. पटेल 38 (56 चेंडूत 5 चौकार), अक्षर पटेल झे. ब्लंडेल, गो. साऊदी 3 (9 चेंडू), उमेश यादव नाबाद 10 (34 चेंडूत 1 षटकार), इशांत शर्मा पायचीत गो. पटेल 0 (5 चेंडू). अवांतर 12. एकूण 111.1 षटकात सर्वबाद 345

गडी बाद होण्याचा क्रम

1-21 (मयांक, 7.5), 2-82 (शुभमन, 29.6), 3-106 (पुजारा, 37.4), 4-145 (रहाणे, 49.2), 5-266 (जडेजा, 86.6), 6-288 (साहा, 92.2), 7-305 (श्रेयस, 96.1), 8-313 (अक्षर पटेल, 98.6), 9-339 (अश्विन, 109.2), 10-345 (इशांत, 111.1).

गोलंदाजी

टीम साऊदी 27.4-6-69-5, काईल जेमिसन 23.2-6-91-3, अजाज पटेल 29.1-7-90-2, विल्यम सॉमरव्हिले 24-2-60-0, रचिन रविंद्र 7-1-28-0.

न्यूझीलंड पहिला डाव ः टॉम लॅथम खेळत आहे 50 (165 चेंडूत 4 चौकार), विल यंग खेळत आहे 75 (180 चेंडूत 12 चौकार). अवांतर 4. एकूण 57 षटकात बिनबाद 129.

गोलंदाजी

इशांत शर्मा 6-3-10-0, उमेश यादव 10-3-26-0, रविचंद्रन अश्विन 17-5-38-0, रविंद्र जडेजा 14-4-28-0, अक्षर पटेल 10-1-26-0.

मायभूमीतील कसोटी पदार्पणात शतक झळकावणारे भारतीय फलंदाज

फलंदाज / धावा / प्रतिस्पर्धी / ठिकाण / वर्ष

लाला अमरनाथ / 118 / इंग्लंड / मुंबई / 1933

दीपक शोधन / 110 / पाकिस्तान / कोलकाता / 1952

एजी कृपाल सिंग / 100ना. / न्यूझीलंड / हैदराबाद / 1955

हनुमंत सिंग / 105 / इंग्लंड / दिल्ली / 1964

गुंडाप्पा विश्वनाथ / 137 / ऑस्ट्रेलिया / कानपूर / 1969

मोहम्मद अझरुद्दीन / 110 / इंग्लंड / कोलकाता / 1985

शिखर धवन / 187 / ऑस्ट्रेलिया / मोहाली / 2013

रोहित शर्मा / 177 / विंडीज / कोलकाता / 2013

पृथ्वी शॉ / 134 / विंडीज / राजकोट / 2018

श्रेयस अय्यर / 100ना. / न्यूझीलंड / कानपूर / 2021

Related Stories

पाकचा इंग्लंड दौरा थांबणार नाही : जाईल्स

Patil_p

अमेरिकेच्या ऍथलेटिक्स संघाचे जपानमधील सराव शिबीर रद्द

Amit Kulkarni

ऑस्ट्रेलियाच्या सर्वोत्तम वनडे संघाचे नेतृत्व बोर्डरकडे

Patil_p

नेपाळ, कॅनडा संघांची विजयी सलामी

Patil_p

वेटलिफ्टर मार्किओचे आव्हान समाप्त

Patil_p

सेनादलाकडून महाराष्ट्र पराभूत

Patil_p
error: Content is protected !!