Tarun Bharat

भारतातील कोरोनाबाधितांची संख्या 9 लाखांवर

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 

भारतातील कोरोनाबाधितांची संख्या 9 लाखांवर पोहचली आहे. मागील 24 तासात देशात 28 हजार 498 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर 553 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या आता 9 लाख 06 हजार 752 वर पोहचली असून, मृतांची संख्या 23 हजार 727 एवढी आहे.

सध्या देशात 3 लाख 11 हजार 565 ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 5 लाख 71 हजार 460 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 

महाराष्ट्रात आतापर्यंत 2 लाख 60 हजार 924 रुग्ण आढळले आहेत. दिल्ली 1 लाख 13 हजार 740, तामिळनाडूत 1 लाख 42 हजार 798, गुजरातमध्ये 42 हजार 722, मध्यप्रदेश 18 हजार 207, आंध्र प्रदेश 31 हजार 103, बिहार 17 हजार 959, राजस्थान 24 हजार 936, उत्तरप्रदेश 38 हजार 130 तर पश्चिम बंगालमध्ये 31 हजार 448 कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. 

Related Stories

भाजप नेत्या सोनाली फोगाट यांच्या घरी चोरी

Tousif Mujawar

‘निपाह’चा रिपोर्ट तासाभरात हातात!

datta jadhav

वस्त्रोद्योगाला गती, शेतकऱ्यांना आधार

Patil_p

ई़डी चौकशीला पूर्ण सहकार्य करणार- हसन मुश्रीफ

Archana Banage

भाजपकडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर

Patil_p

नव्या बाधितांमध्ये पुन्हा किंचित वाढ

Patil_p