Tarun Bharat

भारतातील कोरोना चाचण्या अविश्वासार्ह

ऑनलाईन टीम / केनबर्रा :     

भारतातून ऑस्ट्रेलियात परतणाऱ्या प्रवाशांची कोरोना चाचणी अविश्वासार्ह आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या आरोग्यव्यवस्थेवर नव्या समस्या निर्माण होत असल्याचे वेस्ट ऑस्ट्रेलिया स्टेट प्रीमियर मार्क मॅकगोवन यांनी म्हटले आहे.  

मार्क मॅकगोवन यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, ‘मी पूर्ण खात्रीने सांगू शकतो की, देशात मागील 24 तासात कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नाही. मात्र, आज चार नवे कोरोना रुग्ण आढळले असून, ते सर्वजण भारतातून परतले आहेत. त्यांना एका हॉटेलमध्ये क्वारंटाईन करण्यात आले आहे. 

कोरोना टेस्ट निगेटिव्ह आल्यानंतरच विमान प्रवास करता येत आहे. भारतात कोरोना निगेटिव्ह असलेले प्रवाशी ऑस्ट्रेलियात पॉझिटिव्ह आढळत आहेत. आज सकाळीच एक विमान ऑस्ट्रेलियात दाखल झाले आहे. या विमानातून आलेल्या 78 जणांपैकी अनेक जण कारोना पॉझिटिव्ह येण्याची शक्यता आहे. कारण भारतीय कोरोना चाचण्या अचूक नाहीत, अथवा आम्ही त्यावर विश्वास ठेवू शकत नाही, असे मॅकगोवन यांनी स्थानिक मीडियाला सांगितले. दरम्यान, ऑस्ट्रेलियन सरकारने भारतीय विमानसेवा 15 मे पर्यंत स्थगित ठेवली आहे.

Related Stories

ब्राझीलमध्ये 27 लाख रुग्ण कोरोनामुक्त

datta jadhav

अफगाणिस्तान : फैजाबादमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के

Tousif Mujawar

स्वत:च्या संरक्षणासाठी देश एकजुटीने लढणार

Patil_p

भारतीय महिलेचा मृत्यू, पोर्तुगालमध्ये मंत्र्याचा राजीनामा

Patil_p

अमेरिकेत विमान कोसळून 2 जणांचा मृत्यू

Patil_p

भारताला अत्याधुनिक लढाऊ विमाने देणार अमेरिका

Patil_p
error: Content is protected !!