Tarun Bharat

भारतातील कोरोना रुग्णसंख्या 75 लाखांच्या उंबरठ्यावर

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 

भारतातील कोरोना रुग्णसंख्या 75 लाखांच्या उंबरठ्यावर येऊन ठेपली आहे. मागील 24 तासात देशात 61 हजार 871 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 1033 रुग्णांचा मृत्यू झाला. देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 74 लाख 94 हजार 552 वर पोहचली असून, मृतांची एकूण संख्या 1 लाख 14 हजार 031 एवढी आहे. 

सध्या देशात 7 लाख 83 हजार 311 ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 65 लाख 97 हजार 210 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 

देशात आतापर्यंत 9 कोटी 42 लाख 24 हजार 190 नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यामधील 9 लाख 70 हजार 173 कोरोना चाचण्या शनिवारी (दि.17) करण्यात आल्या.

Related Stories

माजी क्रिकेटपटू, उत्तर प्रदेशचे मंत्री चेतन चौहान यांचं कोरोनानं निधन

Archana Banage

कोरोना : उत्तराखंडातील रुग्णांनी ओलांडला 93 हजारांचा टप्पा

Tousif Mujawar

काँग्रेस च्या प्रचाराशी संबंधित कंपन्यांची बेहिशेबी गुंतवणूक उघडकीस

Patil_p

पंजाब : तलवारीने कापलेल्या ‘त्या’ अधिकाऱ्याचा हात जोडण्यात डॉक्टरांना यश

prashant_c

विधानभवनात आमदाराचं खाली डोकं वर पाय

Abhijeet Khandekar

बिगर मुस्लिमांना नागरिकत्व देण्याचा 31 जिल्हय़ांना अधिकार

Patil_p