Tarun Bharat

भारतातील रस्त्यांवर धावणार विंटेज कार

सरकारने देशात विंटेज वाहनांचा वारसा जोपासण्याची तयारी केली आहे. रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्रालयाने या वाहनांच्या नोंदणी प्रक्रियेचे सादरीकरण केले आहे. विंटेज वाहनांची नोंदणी करत देशात या वाहनांचा वारसा सुरक्षित करण्याचे लक्ष्य असल्याचे रस्ते परिवहन मंत्री नितिन गडकरी यांनी यापूर्वी म्हटले होते.

देशात यापूर्वी विंटेज वाहनांच्या नोंदणीसाठी कुठलेच नियम किंवा प्रक्रिया नव्हती. पण नवे नियम लोकांना अशा वाहनांची सुलभ नोंदणी करण्याची सुविधा प्रदान करणार आहेत. नव्या प्रस्तावित नोंदणी प्रक्रियेनुसार ज्या विंटेज वाहनांची पूर्वीच नोंदणी आहे, त्यांना स्वतःचा क्रमांक कायम ठेवता येणार आहे. तर विंटेज वाहनांमध्ये नव्याने सामील होणाऱया वाहनांसाठी नवी ‘व्हीए’ सीरिज सुरू केली जाईल.

कुठल्या वाहनांना विंटेज म्हटले जाणार हे सरकारने नव्या नियमांमध्ये स्पष्ट पेल आहे. स्वतःच्या पहिल्या नोंदणीला 50 वर्षे पूर्ण केलेल्या वाहनांना वेंटेज श्रेणीत समाविष्ट केले जाईल. यात वैयक्तिक वापर किंवा विनावाणिज्यिक वापराच्या चारचाकी तसेच दुचाकी वाहनांचा समावेश असणार आहे.

सब्सटेंशियल ओवरहॉलिंग झालेल्या तसेच चेसिस किंव बॉडी शेल किंवा इंजिनमध्ये मॉडिफिकेशन झालेलय वाहनांना विंटेज शेणीत सामील केले जाणार नाही. देशात विंटेज वाहने केवळ प्रदर्शन किंवा रॅलीसाठीच धावू शकतील. किंवा त्यांना पेट्रोल भरणे, मॅकेनिककडे नेण्यासाठीच रस्त्यांवर आणता येणार आहे. या वाहनांवरून तांत्रिक संशोधनही केले जाणार आहे.

Related Stories

चार महत्वाच्या परीक्षांमध्ये प्रथम क्रमांक

Patil_p

सिद्धू मुसेवाला हत्येप्रकरणी तिसऱया शार्पशूटरला अटक

Patil_p

आसाममध्ये पुरामुळे 22 लाख लोक प्रभावित

Patil_p

हॅलेप-बिट्रेझ माया अंतिम लढत

Patil_p

झारखंडमध्ये राजकीय संकट कायम

Amit Kulkarni

बिहार बनतेय घुबडांच्या पसंतीचे राज्य

Patil_p