Tarun Bharat

भारतात कोरोनाचे आणखी दोन नवे स्ट्रेन

Advertisements

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 

ब्रिटिश कोरोनानंतर भारतात दक्षिण आफ्रिका आणि ब्राझीलमधील आणखी दोन नवे स्ट्रेन आढळून आले आहेत. त्यामुळे भारताची चिंता वाढली आहे. 

आयसीएमआरचे महासंचालक बलराम भार्गव म्हणाले, जानेवारीत दक्षिण आफ्रिकेतून भारतात आलेल्या दोन जणांना आणि अंगोला आणि टांझानियाहून आलेल्या दोघांना एसएआरएस-सीओव्ही -2 या कोरोनाच्या नव्या स्ट्रेनची लागण झाल्याचे समोर आले. तर फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात ब्राझीलमधून भारतात आलेल्या एकाला नवकोरोनाची लागण झाल्याचे समोर आले.

त्यानंतर या बाधित प्रवाशांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यात आली असून, त्यांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. त्यांना कोरोना लस देण्यात आली असून, लसीचा काय परिणाम होतो, याची चाचणी सुरू आहे.

Related Stories

थकीत ‘डीए’संबंधी अद्याप निर्णय नाही

Patil_p

निवडणूक रणनीतीसाठी नड्डा त्रिपुरा दौऱयावर

Patil_p

लडाख, काश्मीरमध्ये 4.2 तीव्रतेचा भूकंप

Amit Kulkarni

बिगर विमा क्षेत्रातून प्रीमियममधून 17 हजार कोटी प्राप्त

Patil_p

…तर आम्ही कर कमी करू; ममता बॅनर्जींचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

Archana Banage

देशात बेरोजगारी दरात वाढ

Amit Kulkarni
error: Content is protected !!