Tarun Bharat

भारतात कोरोनाबाधितांची संख्या 15 लाखांवर

Advertisements

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 

भारतात कोरोनाबाधितांच्या संख्येने 15 लाखांचा टप्पा पार केला आहे. देशात मागील 24 तासात 48 हजार 513 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 768 रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या आता 15 लाख 31 हजार 699 वर पोहचली असून, मृतांची संख्या 34 हजार 193 एवढी आहे. 

सध्या देशात 5 लाख 09 हजार 447 ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 9 लाख 88 हजार 030 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 

आतापर्यंत देशात 1 कोटी 77 लाख 43 हजार 740 नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी 4 लाख 8 हजार 855 रुग्णांची मंगळवारी एका दिवसात तपासण्यात आले आहेत.

Related Stories

सिंघू हत्या प्रकरणी तिघांना पोलीस कोठडी

Patil_p

कॅलीस, झहीर अब्बास, स्थळेकर यांचा आयसीसी हॉल फेममध्ये समावेश

Patil_p

आयआयटी कानपूरच्या विद्यार्थ्यांची चांदी

Patil_p

निर्भय क्रूज क्षेपणास्त्राचे यशस्वी परीक्षण

Patil_p

भ्रष्टाचारात सामील अधिकाऱयांच्या संख्येत वाढ

Patil_p

एआयएमआयएमचे ट्विटर अकौंट हॅक

Patil_p
error: Content is protected !!