Tarun Bharat

भारतात कोरोनाबाधितांनी ओलांडला 30 लाखाचा टप्पा

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 

भारतातील कोरोनाबाधितांच्या संख्येने 30 लाखाचा टप्पा ओलांडला आहे.मागील 24 तासात देशात 69 हजार 239 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 912 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 30 लाख 44 हजार 941 वर पोहचली असून, मृतांची एकूण संख्या 56 हजार 706 एवढी आहे. 

सध्या देशात 07 लाख 07 हजार 668 ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 22 लाख 80 हजार 567 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 

आतापर्यंत देशात 3 कोटी 52 लाख 92 हजार 220 नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी 8 लाख 01 हजार 147 रुग्णांची तपासणी शनिवारी एका दिवसात करण्यात आली.

Related Stories

पाकच्या चालबाजीविरोधात भारताचे ‘चॅलेंजर’

Patil_p

पंजाबमध्ये 1,100 नवे कोरोना रुग्ण

Tousif Mujawar

देशात कोरोनामुक्तांचे प्रमाण वाढतेय!

Amit Kulkarni

दोन खलिस्तानवाद्यांची संपत्ती होणार जप्त

Patil_p

लाल टोपीला घाबरल्याने उद्घाटनांचा धडका ; जया बच्चन यांचे भाजपवर टीकास्त्र

Abhijeet Khandekar

देशाचा पहिला खासगी रॉकेट प्रक्षेपणासाठी सज्ज

Patil_p