Tarun Bharat

भारतात कोरोनाबाधितांनी ओलांडला 40 लाखाचा टप्पा

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 

भारतात कोरोनाबाधितांनी 40 लाखाचा टप्पा ओलांडला आहे. देशात मागील 24 तासात 86 हजार 432 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 1089 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 40 लाख 23 हजार 179 वर पोहचली असून, मृतांची एकूण संख्या 69 हजार 561 एवढी आहे. 

सध्या देशात 8 लाख 46 हजार 395 ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 31 लाख 07 हजार 223 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 

आतापर्यंत देशात 4 कोटी 77 लाख 38 हजार 491 नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी 10 लाख 59 हजार 346 रुग्णांची तपासणी शुक्रवारी एका दिवसात करण्यात आली.

Related Stories

राम मंदिर उभारणीचे 60 टक्के काम पूर्ण

Patil_p

काँग्रेस संसदीय दलाची आज महत्त्वाची बैठक

Patil_p

अमेरिकेच्या अध्यक्षांचा चाचण्यांसंबंधी नवा दावा

Patil_p

5G तंत्रज्ञान पूर्णत: स्वदेशी, भारत इतर देशांनाही पुरवणार

datta jadhav

शेतकऱ्यांना चिरडणारी ‘ती’ कार आमचीच; केंद्रीय मंत्र्याची कबुली

datta jadhav

पुदुचेरी : रंगास्वामींनी सोडली भाजपची साथ

datta jadhav