Tarun Bharat

भारतात कोरोनाबाधितांनी ओलांडला 1 कोटींचा आकडा

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 

भारतात कोरोनाबाधितांच्या संख्येने एक कोटींचा आकडा ओलांडला आहे.  मागील 24 तासात देशात 25 हजार 153 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 342 रुग्णांचा मृत्यू झाला. देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 1 कोटी 04 हजार 825 वर पोहचली असून, मृतांची एकूण संख्या 1 लाख 45 हजार 136 एवढी आहे.

शनिवारी दिवसभरात 29,885 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. सध्या देशात 3 लाख 08 हजार 851 ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 95 लाख 50 हजार 712 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले आहेत.

देशात आतापर्यंत 16 कोटी 90 हजार 514 नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यामधील 11 लाख 71 हजार 868 कोरोना चाचण्या शनिवारी (दि.18) करण्यात आल्या. 

Related Stories

नव्याने सुरुवात करूया!

Patil_p

लघू-मध्यम उद्योगक्षेत्रात रोजगारनिर्मितीची योजना

Patil_p

योगींनी सादर केले रिपोर्ट कार्ड

Patil_p

कोरोना काळात आता श्रद्धेचा बूस्टर डोस

Patil_p

बेंगळूर शहरातील रुग्णसंख्या 216 वर

Patil_p

बळजबरीने कुणाचं भलं करतात का?

Patil_p