Tarun Bharat

भारतात तिसऱ्या लसीला हिरवा कंदील

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 

‘स्पुतनिक-व्ही’ या रशियन लसीच्या आपत्कालीन वापराला केंद्र सरकारने हिरवा कंदील दाखवला आहे. भारतात सध्या सीरमची ‘कोविशिल्ड’ आणि भारत बायोटेकची ‘कोव्हॅक्सिन’ लस वापरली जात आहे. ‘स्पुतनिक-व्ही’ ही भारतामध्ये उपलब्ध होणारी तिसरी लस आहे.

रशियातील गॅमलिया रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ एपिडेमिओलॉजी अँड मायक्रोबायोलॉजीने ‘स्पुतनिक-व्ही’ ही लस विकसित केली आहे. हैदराबादमधील फार्मा कंपनी डॉ. रेड्डीज लॅबने रशियन डायरेक्ट इन्वेस्टमेंट फंडासोबत ही लस भारतात तयार करण्यासाठी करार केला आहे. 

या लसीला भारतात वापरासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी डॉ. रेड्डीज लॅबने भारतीय औषध महानियंत्रक मंडळाकडे केली होती. या लसीशी संबंधित अधिक माहिती घेऊन लसीच्या आपत्कालीन वापरास मंजुरी मिळाली आहे. ही लस कोरोनाविरोधात 91.6 टक्के प्रभावी असल्याची नोंद ऑगस्टमध्येच करण्यात आली आहे.

सुरुवातीला डॉ. रेड्डीज लॅब रशियातून ही लस आयात करणार आहे. त्यामुळे तिची किंमत जास्त असण्याची शक्यता आहे. मात्र, भारतात उत्पादन सुरू झाल्यानंतर लसीची किंमत कमी होईल, असे सांगण्यात येते.

Related Stories

पाक सैन्याने दिले दहशतवादाचे प्रशिक्षण

Patil_p

खरंच हा मुख्यमंत्री खूप वाईट आहे; जितेंद्र आव्हाडांचा भाजप नेत्यांच्या टीकेला उपरोधिक टोला

Archana Banage

अजमल यांनी फेकला ‘गमोसा’

Amit Kulkarni

समाजमाध्यम वापरावरील बंदी हटविण्याचा निर्णय

tarunbharat

महामार्गावर विमान, शेतात उतरले हेलिकॉप्टर

Patil_p

रामजन्मभूमी ट्रस्टच्या लोगोचे अनावरण

Patil_p