Tarun Bharat

भारतात मागील 24 तासात सर्वाधिक नवे कोरोना रुग्ण

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 

भारतात मागील 24 तासात सर्वाधिक नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. मंगळवारी 15 हजार 968 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर 465 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या आता 4 लाख 56 हजार 183 वर पोहचली असून, मृतांची संख्या 14 हजार 476 एवढी आहे.

सध्या देशात 1 लाख 83 हजार 022 ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 2 लाख 58 हजार 685 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 

महाराष्ट्रात आतापर्यंत 1 लाख 39 हजार 010 रुग्ण आढळले आहेत. दिल्ली 66 हजार 602, तामिळनाडूत 64 हजार 603, गुजरातमध्ये 28 हजार 371, मध्यप्रदेश 12 हजार 261, आंध्र प्रदेश 10 हजार 002, बिहार 8153, राजस्थान 15 हजार 627, उत्तरप्रदेश 18 हजार 893 तर पश्चिम बंगालमध्ये 14 हजार 728 कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. 

Related Stories

भोपाळ वायुदुर्घटना प्रकरणी केंद्राकडून माहिती घेण्याचा आदेश

Patil_p

3 भारतीय छायाचित्रकारांना पुलित्झर

Patil_p

”थोडी जरी शिल्लक असेल तर केंद्राने देशाची जाहीर माफी मागावी”

Archana Banage

अनिल देशमुखांवर ईडीकडून गुन्हा दाखल

Patil_p

दिल्लीतील मुलांशी मेलानियांचा संवाद

tarunbharat

न्यायाधीशाच्या चौकशीची सीबीआयला अनुमती

Patil_p