Tarun Bharat

भारतात मागील 24 तासात साडेअकरा हजार नवीन कोरोना रुग्ण

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 

भारतात मागील 24 तासात 11 हजार 502 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर 325 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या आता 3 लाख 32 हजार 424 वर पोहचली असून, मृतांची संख्या 9520 एवढी आहे.

सध्या देशात 1 लाख 53 हजार 106 ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 1 लाख 69 हजार 798 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 

महाराष्ट्रात आतापर्यंत 1 लाख 0 हजार 958 रुग्ण आढळले आहेत. दिल्ली 41 हजार 182, तामिळनाडूत 44 हजार 661, गुजरातमध्ये 23 हजार 544, मध्यप्रदेश 10 हजार 802, आंध्र प्रदेश 6163, बिहार 6470, राजस्थान 12 हजार 694, उत्तरप्रदेश 13 हजार 615 तर पश्चिम बंगालमध्ये 11 हजार 087 कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. 

Related Stories

मराठा आरक्षण सुनावणी पुन्हा लांबणीवर

Patil_p

पी. चिदंबरम आणि त्यांच्या मुलाला मोठा दिलासा

Archana Banage

कोझीकोड विमान अपघात चालकाच्या चुकीमुळे

Patil_p

राज्ये अन् केंद्रशासित प्रदेशांना नोटीस

Patil_p

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्या रंगपंचमीच्या शुभेच्छा!

tarunbharat

मदर डेअरी करणार तूप व्यवसायात वृद्धी

Patil_p