Tarun Bharat

भारतात मागील 24 तासात 24,850 नवे कोरोना रुग्ण, 613 मृत्यू

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 

भारतात मागील 24 तासात सर्वाधिक कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. शनिवारी देशात 24 हजार 850 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 613 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या आता 6 लाख 73 हजार 165 वर पोहचली असून, मृतांची संख्या 19 हजार 268 एवढी आहे.

सध्या देशात 2 लाख 44 हजार 814 ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 4 लाख 09 हजार 083 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 

महाराष्ट्रात आतापर्यंत 2 लाख 064 रुग्ण आढळले आहेत. दिल्ली 97 हजार 200, तामिळनाडूत 1 लाख 07 हजार 001, गुजरातमध्ये 35 हजार 312, मध्यप्रदेश 14 हजार 604, आंध्र प्रदेश 17 हजार 699, बिहार 11 हजार 700, राजस्थान 19 हजार 532, उत्तरप्रदेश 26 हजार 554 तर पश्चिम बंगालमध्ये 21 हजार 231 कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. 

Related Stories

12 ते 18 वयोगटासाठी लवकरच ‘झायडस’ची लस

Patil_p

चार उच्च न्यायालयांमध्ये मुख्य न्यायाधीश नियुक्त

Patil_p

जूनमध्ये घसघशीत जीएसटी संकलन

Patil_p

न्यायमूर्ती चंद्रचूड बनले 50 वे सरन्यायाधीश

Patil_p

दिल्लीत बाधितांची संख्या 6.80 लाखांच्या उंबरठ्यावर!

Tousif Mujawar

वृद्ध आईला काटय़ांमध्ये ढकलून पळाला

Patil_p