Tarun Bharat

भारतात लवकरच NASAL व्हॅक्सिनची निर्मिती

Advertisements

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 

इंजेक्शनने दिल्या जाणाऱ्या कोरोना लसीला पर्याय म्हणून भारतात लवकरच नाकावाटे देण्यात येणाऱ्या लसीची निर्मिती होणार आहे. ‘भारत बायोटेक’ या औषध निर्माण कंपनीने कोरोना किलर NASAL स्प्रे तयार केला असून, त्याची पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील चाचणी नागपुरात करण्यात आली. भारत बायोटेकचे संचालक डॉ. कृष्ण एल्ला यांनी यासंदर्भात माहिती दिली. 

एल्ला म्हणाले, भारत बायोटेकच्या ‘कोव्हॅक्सिन’ या इंजेक्शनद्वारे दिल्या जाणाऱ्या लसीला भारत सरकारने आपत्कालीन वापरास परवानगी दिली आहे. मात्र, इंजेक्शनद्वारे दिल्या जाणाऱ्या लसीपेक्षा नाकाद्वारे दिली जाणारी लस हा  अधिक चांगला पर्याय आहे. नागपुरात घेण्यात आलेल्या चाचण्यांमधून ते स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या लसीच्या पुढील चाचणीसाठी डीसीजीआयसमोर प्रस्ताव ठेवण्यात येणार आहे.

लवकरच भुवनेश्वर, पुणे, नागपूर आणि हैदराबाद येथे या लसीची चाचणी घेण्यात येईल. त्यासाठी 18 ते 63 वर्षांपर्यंतच्या 40 ते 45 व्हॉलिंटियर्सची निवड केली जाणार आहे.

Related Stories

उत्तराखंडात 400 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

Tousif Mujawar

मणिपूरमध्ये भाजपने उमेदवारांची नावं जाहीर करताच इच्छुकांनी दिले राजीनामे

Archana Banage

दिल्ली-एनसीआर भूकंपाने हादरले

Patil_p

‘तत्काळ कर्ज’ फसवणुकीचा चीनशी संबंध

Patil_p

पश्चिम बंगालमध्ये 5 व्या टप्प्यातील प्रचार समाप्त

Patil_p

केरळमध्ये भूस्खलन; 13 जणांचा मृत्यू

datta jadhav
error: Content is protected !!