Tarun Bharat

भारतात 2 कोटी नोकरदारांना फटका

कोरोना संसर्गामुळे जगात 50 कोटी रोजगारांचा बळी : भविष्यात सामाजिक विषमता वाढण्याची भीती

वृत्तसंस्था/ संयुक्त राष्ट्र, नवी दिल्ली

कोरोना संसर्गानंतर जगभरात 50 कोटी कामगारांना नोकऱया गमवाव्या लागल्या. यामध्ये 2 कोटी रोजगार भारतातील असल्याचे स्पष्ट झाले आहे. संयुक्त राष्ट्रांच्या इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनचा धक्कादायक अहवाल नुकताच प्रसिद्ध झाला आहे. हा आकडा केवळ संघटित उद्योगातील असून असंघटित क्षेत्राचा आकडा डोळे पांढरा करणारा असेल असे ‘सीएमआयई’ संघटनेने म्हटले आहे.

कोरोना विषाणूपासून सावध राहण्यासाठी सरकारने जाहीर केलेल्या लॉकडाऊनमुळे बहुतांश देशांमध्ये कामकाज ठप्प झाल्याने नोकरदारांना घरी परतावे लागले होते. काही अत्यावश्यक ठिकाणी ‘वर्क फ्रॉम होम’ची सुविधा असली तरी त्याचे प्रमाण फारच कमी होते. रोजगारामध्ये प्रचंड घट झाल्यामुळे निष्क्रियतेचे प्रमाण वाढले असून औद्योगिक विकासासाठी हे मारक असल्याचे ‘आयएलओ’च्या अहवालात म्हटले आहे. रोजगार गेल्यानंतर मिळणाऱया संधी कमी असल्यामुळे या क्षेत्रातून बाहेर पडणाऱयांचे प्रमाणही वाढत आहे. नजिकच्या काळात रोजगाराच्या संधी न वाढल्यास सामाजिक विषमता वाढण्याची भीतीही या अहवालात व्यक्त करण्यात आली आहे.

मोलमजुरी करणाऱयापासून बडय़ा उच्चपदस्थ अधिकाऱयांनाही नोकरी गमवावी लागल्यामुळे कोरोना विषाणूने केलेले नुकसान हे कल्पनेच्या पलीकडचे असल्याचे या संघटनांनी म्हटले आहे. इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन या संयुक्त राष्ट्राच्या जागतिक स्तरावर काम करणाऱया संघटनेने कोरोनामुळे रोजगारावर झालेल्या परिणामाचा अभ्यास केला. त्यात कोरोनाने केलेले नुकसान हे कल्पनेच्या पलीकडे असल्याचे म्हटले आहे.

चालू औद्योगिक वर्षात कामाच्या तासात गेल्या वषीच्या तुलनेत 17 टक्के घट झाली आहे. अर्थव्यवस्था विकासाच्या वाटेवर असलेल्या देशांमध्ये रोजगाराचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. कारण या देशांमध्ये वर्क फ्रॉम होमची सुविधा कमी प्रमाणात उपलब्ध आहे. तसेच अद्यापपर्यंत कोरोना संसर्ग नियंत्रणात न आल्याने अनेक लोक अजूनही बेरोजगारीच्या विळख्यात अडकून पडले आहेत.

आर्थिक स्थिती सावरण्यासाठी लागणार पुढील किमान 3 वर्षे

कोरोना महामारीचा मार आणि त्यातच इंधन दरवाढीचा फटका यामुळे जगभरातील बँकिंग क्षेत्राचे पार कंबरडे मोडले आहे. लॉकडाऊनमुळे उद्योग आणि व्यवसाय गेले सात महिने बंद राहिल्याने बँकांचा आर्थिक व्यवसाय ठप्प होण्याच्या मार्गावर आहे. अशा स्थितीत पुन्हा आपल्या व्यवसायाचा डोलारा पूर्ववत करण्यासाठी जगातील बँकांना किमान पुढील तीन वर्षांचा कालावधी तरी लागेल, असे मत एस अँड पी ग्लोबल रेटिंगच्या सर्वेक्षणात व्यक्त करण्यात आला आहे. कोरोना महामारीत काही मोजक्मयाच देशांच्या बँकिंग क्षेत्राला कमी फटका बसला आहे. त्यात चीन, कॅनडा, सिंगापूर आणि सौदी अरेबिया या देशांच्या बँकांचा समावेश आहे. या देशांतील बँका लवकर म्हणजे 2022 च्या अखेरपर्यंत सावरू शकतील असे या सर्वेक्षणात नमूद करण्यात आले आहे.

Related Stories

कृषी कायदे मागे घेण्याचे विधेयक आज

Patil_p

Visakhapatnam : विशाखापट्टणम आंध्रप्रदेशची नवी राजधानी; मुख्यमंत्री जगन रेड्डी यांची घोषणा

Abhijeet Khandekar

8 आठवडय़ांमध्ये नेमणार तक्रार निवारण अधिकारी

Amit Kulkarni

आझम खान यांना तीन वर्षांची शिक्षा

Amit Kulkarni

आयुष्यमानच्या लाभार्थ्यांना मिळणार कोरोनावर मोफत उपचार

Patil_p

कोरोनाच्या जाळय़ात सापडले ‘देवदूत’

Patil_p