Tarun Bharat

भारतात 75 लाखांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त

Advertisements

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 

भारतात आतापर्यंत 82 लाख 29 हजार 313 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामधील 75 लाख 44 हजार 798 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

मागील 24 तासात देशात 45 हजार 230 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 496 रुग्णांचा मृत्यू झाला. 75.44 लाख रुग्णसंख्येपैकी सध्या 5 लाख 61 हजार 908 ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. देशात 1 लाख 22 हजार 607 रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे. 

देशात 11 कोटी कोरोना चाचण्या

देशात आतापर्यंत 11 कोटी 07 लाख 43 हजार 107 नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यामधील 8 लाख 55 हजार 800 कोरोना चाचण्या रविवारी (दि.1) एका दिवसात करण्यात आल्या.

Related Stories

पाचव्या पिढीच्या लढाऊ विमानाचे डिझाईन तयार

Patil_p

भंवरी देवी हत्येप्रकरणी माजी मंत्र्याला जामीन

Patil_p

पाकिस्तानात हिंदूंवरील अत्याचार सुरूच

Patil_p

गुड न्यूज : लसीच्या चाचणीसाठी पुण्याच्या ‘सिरम इन्स्टिट्यूट’ला डीसीजीआयची परवानगी

Tousif Mujawar

नेपाळ अन् श्रीलंकेतही भाजपचे सरकार येणार

Patil_p

नाशिकनंतर आता पुण्यातही बर्निंग बसचा थरार, प्रवाशांनी भरलेली बस पेटली

Archana Banage
error: Content is protected !!