Tarun Bharat

भारतानं निर्यातीचं 400 अब्ज डॉलर्सचं लक्ष्य गाठलं

Advertisements

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

भारताने पहिल्यांदाच आपलं निर्यातीचं निर्धारित लक्ष्य गाठलं आहे. निश्चित कालावधीच्या 9 दिवस आगोदरच भारताने 400 अब्ज डॉलर्सच्या वस्तूंची निर्यात पूर्ण केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून यासंदर्भात माहिती दिली.

मोदींनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, “भारताने प्रथमच 400 अब्ज डॉलर्सच्या वस्तूंच्या निर्यातीचे लक्ष्य गाठले आहे. या यशाबद्दल मी आमचे शेतकरी, विणकर, एमएसएमई, उत्पादक आणि निर्यातदार यांचे अभिनंदन करतो. आमच्या आत्मनिर्भर भारत प्रवासातील हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. भारताने 9 दिवस आगोदरच निर्धारित लक्ष्य गाठलं आहे.”

भारतातून दररोज सरासरी 1 अब्ज डॉलरची निर्यात होते. म्हणजेच 46 दशलक्ष डॉलर किंमतीचा माल वेगवेगळ्या देशात निर्यात होतो. भारताने पेट्रोलियम पदार्थांची 34.54 टक्के, इलेक्ट्रॉनिक वस्तूंची 32.04 टक्के, अभियांत्रिकी वस्तूंची 33.01 टक्के, कापूस धागा 25.38 टक्के तर रसायनांची 18.02 टक्के निर्यात केली आहे.

Related Stories

शरद पवार पंतप्रधान झाले तर आनंदच होईल – शिवसेना

Abhijeet Shinde

आजपासून संसदेचे पावसाळी अधिवेशन

Patil_p

पंजाबमध्ये कोरोनामुळे दोन जणांचा मृत्यू, 82 नवे रुग्ण 

Rohan_P

हरियाणा : डोंगर कोसळल्याने घडलेल्या दुर्घटनेत 25 जण दबल्याची शक्यता

Sumit Tambekar

गेल्या चोवीस तासांत चौदा राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये एकाही मृत्यूची नोंद नाही

Abhijeet Shinde

संजय राठोड यांच्या राजीनाम्याचे काय झाले ?

Rohan_P
error: Content is protected !!