Tarun Bharat

भारताला वाऱयावर सोडाल तर अडचणीत याल!

Advertisements

डॉ. अदिती नेरुरकर यांनी अमेरिकेला ठणकावले

शेखर सामंत/ सिंधुदुर्ग

भारताला वाऱयावर सोडून तुम्हाला स्वतःपुरता विचार करता येणार नाही. भारताला मदत करावीच लागेल. कारण तुम्ही जी व्हॅक्सीन वा औषधं घेताय ती सर्व माझा भारत देश पुरवतोय. भारत देश अडचणीत आला तर तुम्ही देखील अडचणीत येऊ शकता, अशा खडय़ा शब्दात जागतिक कोरोना विश्लेषक व कोकणकन्या डॉ. अदिती नेरुरकर यांनी अमेरिकेत राहून थेट अमेरिकेलाच ठणकावलं. सी.एन.एन या अमेरिकेच्या राष्ट्रीय चॅनल व वॉशिग्टंन पोस्ट या प्रमुख दैनिकाला दिलेल्या प्रदीर्घ मुलाखतीप्रसंगी त्यांनी अमेरिकेसह भारतावर अवलंबून असलेल्या सर्व विकसित देशांना हा इशारा दिला.

कोकणातील सिंधुदुर्गच्या सुकन्या डॉ. अदिती नेरुरकर या जगप्रसिद्ध ‘हॉवर्ड मेडिकल सेंटर’च्या फिजिशीयन आहेत. जगभरात वैद्यकीय क्षेत्रातील ज्यांच्या ग्लोबल वक्तव्याला गांभीर्याने घेतले जाते, अशा जागतिक पातळीवरील निवडक अ शा आरोग्य विश्लेषकांमध्ये डॉ. नेरुरकर यांचा समावेश आहे. सिंधुदुर्गचे सुपुत्र व अमेरिकेतील प्रसिद्ध वैद्यकीय तज्ञ डॉ. अनिल नेरुरकर यांच्या त्या सुकन्या होत. अमेरिकेवर ओढवलेले कोरोना संकट, या देशात येऊ घातलेली कोरोनाची तिसरी लाट व अमेरिकन नागरिकांनी व्हॅक्सीनेशनकडे केलेले दुर्लक्ष, या मुद्दय़ावर अमेरिकेतल्या सी.एन.एन या प्रमुख चॅनेलवर डॉ. अदिती नेरुरकर यांची प्रदीर्घ मुलाखत घेण्यात आली. ही मुलाखत साऱया जगाने पाहिली. या मुलाखतीत डॉ. नेरुरकर यांनी अतिशय निर्भिडपणे आणि स्पष्ट शब्दात लस घेण्या न घेण्यावरुन अमेरिकेत जो खुळेपणा चालू आहे, त्या बाबत रिपब्लिकन समर्थकांचे कान टोचले. हे कान टोचत असतांना आपल्या भारताला या कोरोनाच्या दृष्टचक्रातून बाहेर काढण्यासाठी मानवतेच्या भावनेतून मदत करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

            50 टक्के अमेरिकन्सचा लसीकरणास नकार

अमेरिकेत माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांचा रिपब्लिकन पक्ष व विद्यमान अध्यक्ष बायडन यांचा डेमोक्रॉटिक असे दोन प्रमुख पक्ष आहेत. यातील रिपब्लिकन समर्थक हे गोरे आणि स्वतःला मुळ अमेरिकन मानणाऱयांपैकी असतात. तर डेमोक्रॉटीक समर्थकांमध्ये अन्य सर्वजण येतात. यातील डेमोप्रॅटीक पक्षाचे सरकार सध्या सत्तेवर आहे. हे सरकार व्हॅक्सीनच्या नावाखाली रिपब्लिकनच्या प्रमुख नेत्यांच्या शरीरात कसली तरी चिप बसवण्याच्या तयारीत आहेत. ही चीप बसवली तर रिपब्लिकन नेत्यांच्या हालचालीवर लक्ष ठेवणे डेमोप्रॅटिक नेत्यांना सोपे होईल. या भीतीयुक्त अफवेने रिपब्लिकन नेत्यांनी कोरोनावरील व्हॅक्सीन घेण्यास स्पष्ट नकार दिलाय. त्यामुळे संपूर्ण अमेरिकेत कोरोना व्हॅक्सीनेशनबाबत संशयाचे वातावरण तयार झाले आहे. आपल्या नेत्यांनी व्हॅक्सीनेशनला नकार दिल्यामुळे त्याचे अनुकरण करत रिपब्लिकन पार्टीच्या कोटय़वधी समर्थकांनीही व्हॅक्सीनेशनला नकार दिलाय. यामुळे अमेरिकतील तब्बल 50 टक्के जनता ही व्हॅक्सीनेशनपासून दूरच राहिली आहे.

असा मूर्खपणा नको

सी.एन.एन वरील आपल्या मुलाखतीत या गोष्टीकडे लक्ष वेधत डॉ. नेरुरकर यांनी अमेरिकेच्या आरोग्यविषयक ऍनॅलेसीस करणाऱया सी.डी.सी या प्रमुख संस्थेच्या रिपोर्टचा हवाला देत एका धक्कादायक गोष्टीकडे साऱया अमेरिकेचे लक्ष  वेधून घेतले. सध्या अमेरिकेत आवश्यकतेपेक्षा कित्येक पट अधिक लस उपलब्ध आहे. येथील नाक्या-नाक्यावर लसीकरण केंदे आहेत. पण तरी देखील  व्हॅक्सीनेशन 50 टक्क्यांवर येऊन थांबलंय. सद्यस्थितीत तिसऱया लाटेला सुरुवात झाली असून सध्या  हॉस्पिटलमध्ये दाखल होताहेत व ज्यांचे मृत्यू होताहेत त्यातील 90 टक्के रुग्ण  लस न घेतलेले आहेत. त्यामुळे कृपा करुन लसीकरणाच्या बाबतीत राजकारण व मूर्खपणा करु नका, असा निर्वाणीचा सल्ला साऱया अमेरिकन्सला त्यांनी दिला आहे.

6.5 कोटी बालके लसीपासून वंचित

अमेरिकेत सुरू झालेल्या तिसऱया लाटेत लहान मुलांना असलेला धोका लक्षात आणून देत ड़ॉ नेरूरकर म्हणाल्या, अमेरिकेत साडेसहा कोटी बालकांनी अद्याप लस घेतलेली नाह़ी नुकत्याच शाळाही सुरू झाल्यात़ या शाळांमध्ये मास्क वापरणेही बंधनकारक ठेवलेले नाह़ी ही बाब अतिशय धोकादायक आह़े 2 वर्षावरील मुलांना तातडीने व्हॅक्सीनेशन होणे गरजेचे असल्याचे त्या म्हणाल्य़ा

   भारत तरला तर तुम्ही तराल.. (  बॉक्स घेणे )

भारतातील कोरोना संकटाविषयी अधिक चिंता व्यक्त करताना त्यांनी आपल्या या देशाला कोरोनाच्या संकटातून बाहेर काढण्यासाठी तातडीने मदत करा, असे आवाहनही त्यांनी अमेरिकन गर्व्हमेंटला केल़े मात्र हे आवाहन करताना त्यांनी अगतिकता न दाखवता अमेरिकेने ही जबाबदारी उपकार म्हणून नव्हे तर कर्तव्याच्या भावनेतून उचलली पाहिजे, असेही सांगितले.

   आज भारत अमेरिकेसहीत संपूर्ण जगाला औषधे पुरवणारा प्रथम क्रमांकाचा देश आह़े अनेक प्रमुख देशांचे आरोग्य भारतावर अवलंबून आह़े जगाला औषध पुरवठा करणाऱया या देशावर मोठय़ा लोकसंख्येमुळे लसीकरणाला मर्यादा येऊ लागल्या आहेत़ एवढय़ा मोठय़ा लोकसंख्येसाठी लस निर्माण करणे व पुरवणे या देशाला आर्थिकदृष्टय़ा पेलवणे कठीण जात आह़े त्यामुळे अमेरिकेसह सर्व विकसित देशांनी भारतातील लसीकरणासाठी या देशाला तातडीने तांत्रिक व आर्थिक मदत करायला हव़ी जेणेकरून भारत या संकटातून सावरू शकेल व सर्व जगाला सक्षमपणे औषध पुरवठा करू शकेल़ मात्र ही बाब अमेरिकेसह इतर देशांनी गांभिर्याने घेतली नाही तर भारताला या संकटातून सावरणे कठीण बनेल आणि माझा हा देश डळमळीत झाला तर अमेरिकेसहीत जगातील अनेक देश डळमळतील, हे ध्यानात ठेव़ा त्यामुळे या सर्व देशांच्या भल्याच्या दृष्टीने तातडीने भारताला मदत करा, अशी सूचना त्यांनी यावेळी केल़ी डॉ. अदिती नेरूरकर यांच्या या मुलाखतीची दखल वॉशिंग्टन पोस्ट या अमेरिकेतील प्रमुख दैनिकानेही घेतली आह़े

Related Stories

रत्नागिरी : कोरोनामुक्त 6 महिन्याच्या बालकाला टाळयांच्या गजरात डिस्चार्ज

Abhijeet Shinde

भांडी पॉलिशच्या बहाण्याने लुटले, दोघांना अटक

Patil_p

सुरतच्या अपहृत बांधकाम व्यावसायिकाची रत्नागिरीतून सुटका

Amit Kulkarni

महामार्गाच्या कामामुळे गाडगीळवाडीतील पाणी दुषित

Patil_p

पाचवी शिष्यवृत्तीत सिंधुदुर्ग राज्यात दुसरा

NIKHIL_N

जिल्हा न्यायालयाच्या नियमित कामकाजास आजपासून सुरूवात

Patil_p
error: Content is protected !!