Tarun Bharat

भारताला हरवून दक्षिण कोरिया अंतिम फेरीत

मस्कत (ओमान) : येथे झालेल्या महिलांच्या आशियाई चषक हॉकी स्पर्धेत बुधवारी भारतीय महिला हॉकी संघाचे आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आले. उपांत्य फेरीच्या सामन्यात दक्षिण कोरियाने विद्यमान विजेत्या भारताचा 3-2 अशा गोलफरकाने पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. या स्पर्धेत आता कांस्यपदकासाठी भारताची लढत चीन किंवा जपान यांच्याबरोबर होईल.

या उपांत्य सामन्यात दक्षिण कोरियातर्फे युनेबी चेओनने 31 व्या मिनिटाला, सेयुंग जू लीने 45 व्या मिनिटाला आणि हेजिन चो ने 47 व्या मिनिटाला गोल नोंदविले. भारतातर्फे नेहाने 28 व्या मिनिटाला तर लालरिमेसियामीने 54 व्या मिनिटाला गोल नोंदविले.

Related Stories

तिरंगी मालिकेत पाकची विजयी सलामी

Patil_p

मागील दोन वर्षात माझा प्रगल्भतेकडे प्रवास

Patil_p

मार्कस ट्रेस्कोथिक इंग्लंडचे नवे फलंदाजी प्रशिक्षक

Patil_p

नवीन वर्षात टीम इंडियाची विजयी सुरुवात; श्रीलंकेवर ७ गड्यांनी मात

Archana Banage

टी-20 मालिकेत ऑस्ट्रेलियाची न्यूझीलंडशी बरोबरी

Patil_p

हैदराबादचा राजस्थानवर तडाखेबंद विजय

Patil_p