Tarun Bharat

भारताविरुद्ध जपानचा 10 गडय़ांनी फडशा

Advertisements

19 वर्षाखालील वयोगटातील क्रिकेट विश्वचषक स्पर्धा

ब्लोमफौंटेन (द. आफ्रिका) / वृत्तसंस्था

विद्यमान विजेत्या भारतीय युवा क्रिकेट संघाने यू-19 आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या साखळी सामन्यात पदार्पणवीर जपानचा 10 गडी राखून अक्षरशः फडशा पाडला आणि उपांत्यपूर्व फेरीतील आपले स्थान जवळपास निश्चित केले. नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारणाऱया भारताने जपानचा 22.5 षटकात अवघ्या 41 धावांमध्येच डाव संपुष्टात आणला आणि प्रत्युत्तरात एकही गडी न गमावता सहज लक्ष्य गाठले.

लेगस्पिनर रवी बिश्नोईने 4 बळी घेतले, हे भारतीय डावातील ठळक वैशिष्टय़ ठरले. यू-19 विश्वचषक स्पर्धेत जपानच्या पदरी संयुक्त निचांकी धावसंख्येची नामुष्की आली असून यू-19 क्रिकेट इतिहासात ही संयुक्त तिसरी निचांकी धावसंख्या ठरली.

रवी बिश्नोईने 4 बळी घेतले तर जलद गोलंदाज कार्तिक त्यागी व आकाश सिंग यांनी एकत्रित 5 बळी घेत जपानच्या डावाला आणखी सुरुंग लावला. जपानच्या एकाही फलंदाजाला दुहेरी धावसंख्याही गाठता आली नाही. यशस्वी जैस्वाल व कुमार कुशाग्रा यांच्या फटकेबाजीमुळे भारताने 4.5 षटकातच विजयाचे लक्ष्य गाठले. यशस्वी जैस्वालने नाबाद 29 तर कुमारने नाबाद 13 धावांचे योगदान दिले. भारताने या स्पर्धेच्या सलामी लढतीत रविवारी श्रीलंकेचा देखील 90 धावांनी धुव्वा उडवला होता. तीच मालिका त्यांनी येथे कायम राखली.

जपानचा संघ आयसीसीची एखादी पहिलीच महत्त्वाची स्पर्धा खेळत असल्याने त्यांना अननुभवाचा फटका बसणे साहजिक होते. पण, यानंतरही भारतीय कर्णधार प्रियम गर्गने आपल्या जलद गोलंदाजांनी आणखी सरस कामगिरी करणे शक्य झाले असते, असे मत नोंदवले. जपानचा कर्णधार मार्कस थुरगेटने या स्पर्धेमुळे आपला संघ अनुभवाने बराच श्रीमंत होऊन मायदेशी परतेल, असे सांगितले. या स्पर्धेत भारतीय संघ शुक्रवारी न्यूझीलंडविरुद्ध आपला शेवटचा सामना खेळणार आहे.

संक्षिप्त धावफलक

जपान युवा संघ : 22.5 षटकात सर्वबाद 41 (शू नोगुची 17 चेंडूत 7, केन्टो डॉबेल 39 चेंडूत 7, मॅक्झिमिलियन क्लेमेंटस 21 चेंडूत 5. अवांतर 19. रवी बिश्नोई 8 षटकात 5 धावात 4 बळी, कार्तिक त्यागी 3-10, आकाश सिंग 2-11, विद्याधर पाटील 1-8).

भारतीय युवा संघ : 4.5 षटकात बिनबाद 42. (यशस्वी जैस्वाल 18 चेंडूत 5 चौकार, 1 षटकारासह नाबाद 29, कुमार कुशाग्रा 11 चेंडूत 2 चौकारांसह 13. युगांधर रेठरेकर 2 षटकात 0-19, डॉबेल 2 षटकात 0-1

Related Stories

दबंग दिल्ली, हरियाणा स्टीलर्स विजयी

Patil_p

राशींचा देश-टॅरोचा संदेश अर्जुनवीर साई सोशल, ऍक्सेस डेव्हलपर्स सीसीआय संघ क्वॉलिफायर फेरीत

Omkar B

सुवेद पारकरचे पदार्पणात शतक

Patil_p

युरोपमध्ये होणाऱ्या जागतिक कुस्ती स्पर्धेसाठी प्रा. दिनेश गुंड यांची पंच म्हणून निवड

Archana Banage

फुटबॉलपटू सलाहला कोरोनाची बाधा

Patil_p

आणखी एक खेळाडू उत्तेजक चाचणीत दोषी

Patil_p
error: Content is protected !!