Tarun Bharat

भारतीय कसोटी संघाचा सराव सामना आजपासून

Advertisements

वृत्तसंस्था/ सिडनी

भारतीय कसोटी संघाचा तीन दिवसांचा सरावाचा सामना ओव्हल मैदानावर रविवारपासून सुरू होत आहे. आगामी कसोटी मालिकापूर्वीचा हा सरावाचा सामना ऑस्ट्रेलिया अ संघाबरोबर होत आहे. दरम्यान रविवारी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील टी-20 मालिकेतील दुसरा सामना खेळविला जाणार असल्याने या सरावाच्या सामन्यासाठी कसोटी संघाला भारत अ असे नामकरण करण्यात आले आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 4 सामन्यांची कसोटी मालिका खेळविली जाणार आहे. या मालिकेतील पहिली कसोटी  ऍडलेड येथे 17 डिसेंबरपासून सुरू होणार असून ही कसोटी दिवस-रात्रीची राहणार आहे. सध्या उभय संघात टी-20 मालिका सुरू असल्याने भारतीय संघ व्यवस्थापनासमोर सराव सामन्यासाठी संघ निवड करताना मोठा समस्या निर्माण झाली आहे. या तीन दिवसांच्या सराव सामन्यात मयांक अगरवालला सलामीसाठी पृथ्वी शॉ किंवा शुभम गिल यापैकी एकाची निवड केली जाईल

आयपीएल स्पर्धेत शॉ याला फलंदाजीत सातत्य राखण्यासाठी झगडावे लागले पण शुभम गिलने आयपीएल स्पर्धेत कोलकोता नाईट रायडर्स संघाकडून खेळताना 440 धावा जमविल्या होत्या. त्याचप्रमाणे ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या तिसऱया आणि शेवटच्या वनडे सामन्यात शुभम गिलची फलंदाजी समाधानकारक झाल्याने रविवारच्या सरावाच्या सामन्यासाठी त्याला अगरवाल समवेत सलामीला निवडले जाईल. यष्टीरक्षणाची जबाबदारी सोपविताना सहा आणि पंत यांच्यापैकी एकाची निवड होईल. उभय संघातील पहिली कसोटी झाल्यानंतर कर्णधार कोहली मायदेशी परतणार असून तो उर्वरित तीन कसोटीसाठी उपलब्ध होणार नसल्याचे समजते. दुखापतग्रस्त रोहित शर्मा संदर्भात खात्री देता येत नाही. आता अजिंक्य रहाणे, पुजारा आणि हनुमा विहारी यांना चांगली कामगिरी करावी लागेल.

कोहलीच्या गैरहजेरीत भारतीय कसोटी संघाचे नेतृत्व कदाचीत अजिंक्य रहाणे कडे सोपविण्याची शक्यता वाटत आहे. पुजारा आणि हनुमा विहारी यांनी गेल्या काही दिवसामध्ये क्रिकेटचा सराव करता आलेला नाही. पहिल्या टी-20 सामन्यात विश्रांती देण्यात आलेला वेगवान गोलंदाज बुमराह याला या सरावाच्या सामन्यात संधी देण्यात येईल. कसोटीमध्ये बुमराह आणि शमी हे नवा चेंडू हाताळणार असून त्यांना मोहम्मद सिराजची साथ राहील. दुखापतीमुळे अष्टपैलू रविंद्र जडेजा टी-20 मालिकेतील शेवटच्या दोन सामन्यात खेळू शकणार नाही.

तंदुरूस्तीनंतरच जडेजा कसोटी मालिकेसाठी उपलब्ध होवू शकेल. फिरकी गोलंदाज रविंचंद्रन अश्विनला सुर मिळविण्यासाठी झगडावे लागेल. जडेजा कसोटी मालिकेसाठी उपलब्ध होवू शकला नाही तर कुलदीप यादवला संधी मिळेल. रविवारपासून खेळविल्या जाणाऱया पहिल्या सरावाच्या सामन्यात नेहमीचा चेंडू वापरला जाईल. त्यानंतर या दौऱयातील दुसरा सरावाचा सामना 11 डिसेंबरपासून खेळविला जाणार असून या सामन्यात गुलाबी रंगाचा चेंडू वापरण्यात येणार आहे.

Related Stories

अर्जेंटिना-पराग्वे फुटबॉल लढत बरोबरीत

Omkar B

INDvsENG अंतिम सामन्यासह भारताचा 3-2 ने मालिका विजय

Archana Banage

14 वर्षीय आदित्य मित्तलला पहिला ग्रॅण्डमास्टर नॉर्म

Amit Kulkarni

भारतीय संघासाठी दोन आठवडय़ांचे क्वारंटाईन

Patil_p

टॉम मुडी लंकेचे क्रिकेट संचालक?

Patil_p

फ्रान्सला नमवून भारत उपांत्यफेरीत

Patil_p
error: Content is protected !!