Tarun Bharat

भारतीय जनता युवा मोर्चाच्या तर्फे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी राजीनामा देण्याची मागणी

प्रतिनिधी/कळंबा

राज्याचे ऊर्जा मंत्री नितिन राऊत यांचे चिरंजीव कुणाल राऊत हे प्रदेश युवक काँग्रेसच्या पदाधिकारी पदाची निवडणूक लढवत आहेत .
त्यांच्या सभासद नोंदणीसाठी मंत्री राऊत हे महावितरणच्या कर्मचाऱ्यांवर दबाव आणत आहेत. मदत करणाऱ्यांना योग्य बक्षिस व न करणाऱ्यांना योग्य ते फळ मिळेल, अशी भाषा बैठकीत कर्मचाऱ्यांना वापरत आहेत. अशा प्रकारे सरकारची यंत्रणा दावणीला बांधणाऱ्या मंत्री नितीन राऊत यांनी राजीनामा द्यावा, या मागणीसाठी भाजप युवा मोर्चातर्फे बुधवारी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

या निवेदनात म्हटले आहे, की राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी स्वतःच्या मुलाला युवक काँग्रेस निवडणुकीत निवडून आणण्यासाठी महावितरणच्या सरकारी यंत्रणेचा वापर करीत अधिकारी, कंत्राटदार यांच्यावर दबाव टाकला आहे. कंत्राटदार यांना पैशाचे आमिष दाखवून तसेच मुलासाठी काम न केल्यास भविष्यात अडचणी येतील असा दबाव आणून धमकावले जात आहे. राज्याच्या ऊर्जा खात्याचा बोजवारा उडालेला असताना ऊर्जामंत्री राज्याकडे लक्ष न देता संपूर्ण महावितरण यंत्रणा पुत्र प्रेमासाठी काँग्रेसच्या दावणीला बांधत आहे, हे योग्य नाही.
ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्या राजीनाम्याविषयी त्वरित कार्यवाही करावी अन्यथा कार्यवाही न झाल्यास भारतीय जनता युवा मोर्चाच्यावतीने राज्यभर उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

सरकारी पदाचा गैरवापर केल्या प्रकरणी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी राजीनामा घ्यावा ही मागणी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्याकडे भारतीय जनता युवा मोर्चाच्या माध्यमातून करण्यात अली. यावेळी भाजप युवा मोर्चा प्रदेश सदस्य विजयेंद्र माने, जिल्हा उपाध्यक्ष डॉ. अरविंद माने, जिल्हा चिटणीस धिरज करलकर पदाधिकारी उपस्थित होते.

Related Stories

पेठ वडगावचा आठवडी बाजार होणार सुरु

Archana Banage

मंडलिक कारखान्याचा गळीत हंगाम शुक्रवारपासून सुरू

Archana Banage

दुधाला पंधरा दिवसांत दुसरी उकळी

Archana Banage

Kolhapur : कोल्हापूरचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावणार- केंद्रिय मंत्री बघेल

Abhijeet Khandekar

कणेरी येथे प्रदूषण मुक्त दीपोत्सव साजरा

Archana Banage

..अन्यथा मुख्यमंत्र्यांना कोल्हापुरात प्रवेश बंद

Abhijeet Khandekar