Tarun Bharat

भारतीय टीमचा प्रशिक्षक व्हायचे आहे : शोएब अख्तर

ऑनलाईन टीम / कराची :

नेहमीच या ना त्या कारणाने चर्चेत राहणारा पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर याने पुन्हा एकदा थेट भारतीय क्रिकेट टीमचा प्रशिक्षक होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. शोएब अख्तरने हॅलो ॲप वरून  मुलाखतीत बोलताना ही इच्छा व्यक्त केली. यामध्ये त्याने अनेक प्रश्नांची उत्तरं दिली. 


तो म्हणाला, भारतीय क्रिकेट संघामध्ये अनेक चांगले खेळाडू आहेत. भुवनेश्वर कुमार आणि बुमराह हे सर्वोत्तम गोलंदाज आहेत. तसेच हार्दिक पंड्या सारख्या अष्टपैलू चे कौतुक करताना तो म्हणाला की, हार्दिक कडे जगातील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू बनण्याची क्षमता आहे. जर मला संधी मिळाली तर मला भारतीय क्रिकेट संघाचा गोलंदाजी प्रशिक्षक बनायला आवडेल. मला माझ्यासारखे वेगवान गोलंदाज भारतात तयार करायचे आहेत. 


मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड बद्दल बोलताना शोएब म्हणाला की, सचिन तेंडुलकर आणि सुनील गावस्कर हे महान खेळाडू होते. पण सचिन पेक्षा राहुल द्रविडला बाद करणे अधिक कठीण होते, असं ही त्याने यावेळी म्हटले आहे. 


तसेच आयपीएल मध्ये मला कोलकाता नाईट रायडर्स टीम साठी गोलंदाज प्रशिक्षक बनायला आवडेल असं ही त्याने यावेळी सांगितले. 


बायोपिकमध्ये कोणत्या बॉलिवूड अभिनेत्याने भूमिका करावी, असा प्रश्न विचारला असता शोएब म्हणाला, माझ्या बायोपिकमध्ये दबंग खान सलमान खान ने माझी भूमिका करावी, असे म्हटले आहे. 

Related Stories

युवा टेनिसपटूंच्या आर्थिक मदतीसाठी त्रिमूर्तीचा पुढाकार

Omkar B

भारत-स्पेन आज प्रो लीग हॉकी सामने

Patil_p

देविका, प्रिती उपांत्यपूर्व फेरीत

Patil_p

मिल्खा सिंग यांना रूग्णालयातून डिस्चार्ज

Patil_p

उज्ज्वल भविष्यासाठी पद्म पुरस्कार दीपस्तंभासमान

Patil_p

अल्टिमेट खो खो स्पर्धेत ओडिशा जगरनट्स संघाला विजेतेपद

Patil_p