Tarun Bharat

भारतीय नौदलाचे 50 वे विजय वर्ष

Advertisements

1971 च्या भारत-पाक युद्धाला 50 वर्षे पूर्ण – कराची हार्बर नष्ट करणाऱया किलर स्क्वाड्रनला मिळणार पुरस्कार

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

भारतीय नौदलाकडून 4 डिसेंबर म्हणजेच शनिवारी स्वतःचे शौर्य आणि कामगिरीचा गौरव करण्यासाठी नौदल दिन साजरा करण्यात आला. 04 डिसेंबर 1971 रोजी भारत-पाक युद्धादरम्यान भारतीय नौदलाने पाकिस्तानच्या विरोधात ऑपरेशन ट्रायडेंट चालविले होते. सुमारे 5 दिवसांपर्यंत ही पूर्ण मोहीम चालली अणि यात कराची हार्बरला मोठे नुकसान पोहोचले होते.

यंदा 1971 च्या युद्धातील विजयाला 50 वर्षे पूर्ण होत आहेत. याचमुळे नौदल याला स्वर्णिम विजय वर्ष म्हणून साजरे करत आहे. तर कराची हार्बर नष्ट करणाऱया किलर स्क्वाड्रनला प्रेसिडेंट स्टँडर्ड अवॉर्डने सन्मानित केले जाणार आहे. हा पुरस्कार 8 डिसेंबर रोजी मुंबईच्या नेव्हल डॉकयार्डमध्ये देण्यात येणार आहे.

22 मिसाइल स्क्वाड्रनला 1971 च्या युद्धात शौर्य दाखविल्याबद्दल आणि 50 वर्षे देशाची सेवा केल्याप्रकरणी प्रेसिडेंट स्टँडर्ड अवॉर्डने गौरविण्यात येईल. 22 मिसाइल स्क्वाड्रनला किलर स्क्वाड्रन या नावानेही ओळखले जाते. या स्क्वाड्रनच्या ताफ्याने कराची हार्बरला उद्ध्वस्त करत 6 पाकिस्तानी युद्धनौकांना जलसमाधी दिली होती. या ताफ्यात आयएनएस निर्घट, आयएनएस निपात आणि आयएनएस वीर सामील होते.

नौदलाने 8-9 डिसेंबरच्या रात्री ऑपरेशन पाइथन राबविले होते. या मोहिमेत आयएनएस विनाशसोबत नौदलाच्या दोन फ्रिगेट त्रिशू आणि तलवारही सामील होत्या. आयएनएस विनाशने कराचीच्या कीमारी तेलडेपोला लक्ष्य केले होते. त्यांच्या याच 2 यशस्वी मोहिमांमुळे याला किलर स्क्वाड्रन नाव देण्यात आले. सध्या या स्क्वाड्रनमध्ये 2 प्रबळ आणि 6 वीर क्लास नौका सामील आहेत.

हिट फर्स्ट अँड हिट हार्ड

किलर स्क्वाड्रनची स्थापना 1960 मध्ये झाली होती. या स्क्वाड्रनच्या निर्मितीचा उद्देश शत्रूंवर सर्वप्रथम हल्ला करणे आहे. ‘हिट फर्स्ट अँड हिट हार्ड’ हा या किलर स्क्वाड्रनचा मोटो आहे.

Related Stories

‘क्वाड’चा कार्यक्रम जगाच्या हितासाठी

Patil_p

परिस्थितीप्रमाणे धोरण बदलणे आवश्यक

Amit Kulkarni

केरळमध्ये सापडला मंकीपॉक्सचा रुग्ण

Amit Kulkarni

नव्या संसद भवनात होणार हिवाळी अधिवेशन

Amit Kulkarni

कारगिलमध्ये भूकंपाचे धक्के

datta jadhav

चिनी कंपनीचे कंत्राट रद्द

Patil_p
error: Content is protected !!