Tarun Bharat

भारतीय परंपरेतला ‘वानप्रस्थाश्रम’ अनुभवतोय…!

Advertisements

कोरोनाच्या पार्श्वभुमीवर टोरांटोत सूचनांचे 100 टक्के पालन  मुळ चिपळूणच्या चित्रा कुलकर्णा जपताहेत भारतीयपण

मीरा पोतदार/ चिपळूण

गेली 40 – 50 वर्ष पॅनडा मध्ये राहतोय… आता इथले नागरिकत्व स्वीकारलंय… मात्र जन्मभूमी भारताला आम्ही अजिबात विसरलेलो नाही… विविध कारणांनी भारतात येणं होतंच … गेली चार वर्ष सलग भारतात येतोय .. पण या वर्षी भारतात न येण्याचा निर्णय घेतला तो कीती सार्थ होता त्याची आत्ता जाणीव होतीय…. कोरोनाशी लढताना भारतीय परंपरेतील वरनप्रस्थाश्रमाची आठवण प्रकर्षाने होते…. भारताची आणि भारतीयांची आठवणही पदोपदी येते…. कॅनडाती टोरटो मध्ये राहणाऱया मुळ चिपळूणच्या चित्रा कुलकर्णी ‘तरूण भारत’शी संवाद साधताना खूपच हळव्या झाल्या होत्या.  त्यांच्याशी झालेल्या संवादातील ठळक मुद्दे त्यांच्याच शब्दात…

  जिथे आठ महिने थंडीचे असतात म्हणजेच करोना विषाणू ज्या थंड प्रदेशात तग धरून राहतो अश्या प्रदेशात आम्ही दोघे आणि आमची मुलं, नातवंडही राहतात… पॅनडामधे सध्या तापमान उणे 1 आहे… संपूर्ण पॅनडामधे अंदाजे 20 हजार कोरोनाग्रस्त आहेत. साधारण मार्च महिन्यापासून इथल्या शाळा बंद आहेत… आमच्या नातवंडांची शाळा सध्या ऑनलाईन म्हणजे लॅपटॉपवर शिक्षण सुरु आहे…

नागरिकांचा प्रामाणिक प्रतिसाद  

  इकडे मोलकरीण ही संकल्पना अस्तित्वात नाही… त्यामुळे बाराही महिने सर्व घरकाम कुटुंबातील प्रत्येक सदस्य करतो…  इकडेही भारताप्रमाणे  सर्व शाळा.. मॉल.. वाहतूक सेवा बंद आहेत… पण पॅनडाचे सरकार आणि मध्यम वयातील कार्यकर्ते अहोरात्र आमची काळजी घेत आहेत… किराणा माल.. भाजीसाठी प्रामाणिकपणे प्रत्येक जण अंतर राखून ठेवत आहेत… भारताच्या तुलनेत लोकसंख्या खूप कमी आणि शिक्षणाचे प्रमाण जास्त असल्याने सरकारच्या आवाहनाला लोकं छान प्रतिसाद देत आहेत…

कुटुंबियांशी चर्चाही ‘अंतर’ राखूनच

   आम्ही योग्य अंतर ठेवून आमच्या पार्किंगमध्ये चालण्याचा व्यायाम करतो… अगदी नवरा बायको असलो तरी… खिडकीतुन.. लांबून.. इतर नातेवाईकांनाची चौकशी करतो… इकडे ज्येष्ठ नागरिकांसाठी बाहेर येण्याचा एक तास वेगळा असतो.. किराणा दुकाने उघडत आहेत… फार्मसी अथवा मॉलमधे जाड प्लास्टिक टाकले आहे… त्यातील छोटय़ाश्या खिडकीतून खरेदी-विक्री होते.

शासनाकडून चांगली काळजी

A pedestrian wears a protective mask in Toronto on Monday, January 27, 2020. Canada’s first presumptive case of the novel coronavirus has been officially confirmed, Ontario health officials said Monday as they announced the patient’s wife has also contracted the illness. THE CANADIAN PRESS/Frank Gunn ORG XMIT: FNG109

   इथे भारतासारखी लोकं पटकन एकमेकांच्या घरी कधी जात नाहीत.. तसे सगळेजण कायमच अंतर राखून असतात.. भावनिक गुंतवणूक जास्त नसते.. त्यामुळे  मुळातच जेव्हा तुम्ही परदेशात येता तेव्हा प्रतिकूल हवामान.. खाण्याच्या सवयी व एकूणच प्रत्येक गोष्ट स्वीकारण्यासाठी शरीर आणि मन  सक्षम झालेलं असतं.. आम्ही इकडे पूर्णतः स्वावलंबी जीवन जगतो.. त्यामुळे वय कीती झालंय ही गोष्ट इकडे मॅटर करत नाही… अर्थात पॅनडा सरकार 80 च्या पुढील वयाच्या लोकांची खाण्या पिण्याची औषधांची काळजी नेहमीच घेतात….

नातवंडांना जवळ घेण्यासाठी आसुसलोय

   लॉक डाउनमुळे आम्ही आमच्या नातवंडांना जवळ घेऊ शकत नाही.. त्यांची काळजी घेऊ शकतं नाही ही मोठी खंत आहे… अर्थात अंतर ठेवून आम्ही लांबून त्याचाशी बोलतो… गप्पा मारतो… पण त्यांच्या स्पर्शासाठी आमचं मन आतुरलय… हे ही दिवस जातील असं म्हणत मन रमवतोय…

छंद जोपासताना बालपण आठवतेय

माझे पती अविनाश यांना पेंटिंग ची खूप आवड आहे… त्यामधे ते रमतात… मला विणकामाची आवड आहे.. आज अनेक वर्षांनी मी विणकाम करतेय… त्याचा आनंद शब्दात नाही मांडू शकतं… मन भूतकाळातल्या सुखद आठवणीत विहरुन  येतंय…मला ब्रिज खेळायची पण आवड आहे त्यामुळे संध्याकाळी दोन तास मैत्रिणी ऑनलाईन ब्रिज खेळतो.. 

मुलीचा सार्थ अभिमान

माझी मुलगी चेतना मेडिकल फील्डमधे एखाद्या योध्द्यासारखी लढतेय… तिचा आई म्हणून सार्थ अभिमान आहेच… नातू आकाश त्याला आम्ही दुरूनच बागकाम शिकवतोय… सुन नेहा आणि मुलगा अमर यांनी एका सुंदर मुलीला जन्म दिलाय… तिच्या बाळलीला व्हिडिओवर पाहताना दोघेही सुखावतोय… जिभेचे फार चोचले नाहीत.. त्यामुळे जे काही सामान आहे त्यात आमची पोट पूजा होतेय… शांतपणे विचार केला की वाटत.. पूर्वी जो वानप्रस्थाश्रम प्रकार होता.. त्याची जाणीव निसर्गाने आम्हाला करून दिलीय… कीती आणि कशाकशात गुंतायचं… त्यापेक्षा मिळालेलं हे आयुष्य आपापल्या परीने सुखद कसं करता येईल याचाच विचार केलेला बरा नाही का?… आणि हो या नवीन तंत्रज्ञानामुळे आमचं लॉकडाऊनमधील जीवनही सुकर होतय…   आज तरुण भारत च्या माध्यमातून माझ्या जन्मभूमीतील.. मराठी बांधवांशी शब्दातून का होईना..पण सवांद साधायला मिळाला हेच माझे भाग्य……

Related Stories

राजगृह नासधूसप्रकरणी दोषींवर कारवाई करा!

NIKHIL_N

सिंधुदुर्गचा वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी सांगली – कोल्हापूरहून ५०० कर्मचारी

Archana Banage

चिपळुणात मंदार कॉलेजच्या दहा विद्यार्थ्यांना कोरोना!

Patil_p

वडदहसोळमध्येच कुटुंबच बाधीत

Patil_p

आमदार वैभव नाईक यांनी फुकाचे श्रेय घेऊ नये!

NIKHIL_N

इनोव्हा – कंटेनर अपघातात सात जखमी

Tousif Mujawar
error: Content is protected !!