Tarun Bharat

भारतीय पुरूष कंपाऊंड संघाला सुवर्ण

विश्वचषक स्तरावर लागोपाठ धवल यश, अंतिम लढतीत फ्रान्सविरुद्ध विजय

वृत्तसंस्था/ ग्वेनजिजू (दक्षिण कोरिया)

Advertisements

येथे सुरू असलेल्या विश्वचषक तिरंदाजी स्पर्धेत भारताच्या पुरूष संघाने सांघिक कंपाऊंड प्रकारात सुवर्णपदक पटकाविताना शनिवारी अंतिम लढतीत फ्रान्सचा पराभव केला.

विश्वचषक तिरंदाजी स्पर्धेत सलग दुसऱयांदा भारताच्या पुरूष तिरंदाजपटूंनी सांघिक कंपाऊंड तिरंदाजी प्रकारात सुवर्णपदक पटकाविले आहे. शनिवारी या स्पर्धेत भारतीय पुरूष संघातील तिरंदाजपटू मोहन भारद्वाज याची कामगिरी चमकदार झाली. मोहन भारद्वजने र्वैयक्तिक गटात भारद्वाजने विद्यमान विश्वविजेता निको विनेरचा पराभव केला. भारताच्या महिला तिरंदाजपटूंनी रिकर्व्ह या प्रकारात शुक्रवारी एकमेव कांस्य पदक मिळविले होते. शनिवारी या स्पर्धेत भारताच्या तिरंदाजपटूंनी कपांऊंड तिरंदाजी प्रकारात एक सुवर्ण, एक रौप्य आणि दोन कास्य मिळविली.

पुरूषांच्या कंपाऊंड सांघिक प्रकारात भारताने अंतिम लढतीत फ्रान्सचा 232-230 अशा केवळ दोन गुणांच्या फरकाने पराभव करत सुवर्णपदक मिळविले. या क्रीडाप्रकारात भारतीय संघामध्ये अभिषेक वर्मा, अमन सैनी आणि रजत चौहान यांचा समावेश होता. गेल्यावर्षीच्या एप्रिलमध्ये अँटेलिया येथे झालेल्या विश्वचषक तिरंदाजी स्पर्धेत भारतीय तिरंदाजपटूंनी पुरूषांच्या सांघिक कपांऊंड प्रकारात सुवर्ण मिळविताना फ्रान्सचा केवळ एका गुणांनी पराभव केला होता. चालू वर्षीच्या तिरंदाजी हंगामातील भारतासाठी कंपाऊंड सांघिक तिरंदाजीतील हे दुसरे सुवर्णपदक आहे.

Related Stories

वर्षअखेरीस भारतात आशियाई मुष्टियुद्ध चॅम्पियनशिप

Patil_p

सचिन तेंडुलकर जगातील तिसऱया क्रमांकाचा प्रशंसनीय क्रीडापटू

Patil_p

सुनील चेत्रीचे पुनरागमन, भारतीय संघ दोहास रवाना

Patil_p

बंगाल, मुंबईसह 7 संघ उपांत्यपूर्व फेरीत

Patil_p

मुरलीधरनला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज

Patil_p

वर्षातील सर्वोत्तम टी-20 संघात स्मृती मानधनाची वर्णी

Patil_p
error: Content is protected !!