Tarun Bharat

भारतीय महिलांचा दुसरा विजय

Advertisements

आशिया चषक महिला टी-20 स्पर्धा

वृत्तसंस्था / सिल्हेत, बांगलादेश

महिलांच्या आशिया चषक टी-20 सामन्यात भारताने मलेशियावर डकवर्थ-लुईस नियमाच्या आधारे 30 धावांनी मात करीत दुसरा विजय नोंदवला. सलामीवीर सब्बिनेनी मेघनाने नोंदवलेले पहिले टी-20 अर्धशतक (53 चेंडूत 69) व शफाली वर्मा (46),  रिचा घोष (19 चेंडूत 33) यांच्या उपयुक्त योगदानामुळे भारताने 20 षटकांत 4 बाद 181 अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारली.

त्यानंतर मलेशियाने 5.2 षटकांत 2 बाद 16 धावा जमविल्या असताना पाऊस आल्याने नंतर डी-एल नियमाच्या आधारे भारताला 30 धावांनी विजयी घोषित करण्यात आले.

69 धावा फटकावणाऱया एस. मेघनाला सामन्यातील सर्वोत्तम खेळाडूचा बहुमान मिळाला. एस. मेघनाने शफाली वर्मासमवेत 116 धावांची दमदार शतकी सलामी दिली.


मेघनाने टी-20 सामन्यातील पहिले अर्धशतक नोंदवले.

ताना 53 चेंडूत 69 धावा जमविल्या. पावसामुळे मलेशियाचा डाव थांबवण्यात आला त्यावेळी त्यांना 46 धावांपर्यंत मजल मारणे जरूरीचे होते. पण त्यांनी केवळ 16 धावा जमविल्या असल्याने भारताला 30 धावांनी विजय मिळाला. या विजयानंतर भारताचे 4 गुण झाले असून ते पाकनंतर दुसऱया स्थानावर आहेत.

प्रथम फलंदाजी मिळाल्यावर मेघना व शफाली यांनी मलेशियन गोलंदाजांवर जोरदार आक्रमण केले. फॉर्मसाठी झगडणाऱया शफालीने काही आक्रमक फटके लगावले असले तरी तिला पूर्ण आत्मविश्वासाने खेळता आले नाही. मेघनाने मात्र मिळालेल्या संधीचा फायदा उठवत आक्रमक खेळ केला. तिने प्रत्येक षटकात एक चौकार ठोकण्याचा सपाटा सुरू केल्याने पॉवरप्लेच्या 6 षटकांत बिनबाद 47 धावांची मजल मारली. 14 धावांवर तिला जीवदानही मिळाले. भारत 200 धावांचा टप्पा गाठणार असे वाटत असताना कर्णधार विनिप्रेड दुरायसिंगमने मेघनाचा बळी मिळविला. दुय्यम भूमिका घेतलेल्या शफालीने दोन षटकार खेचले तरी तिला मेघना बाद झाल्यानंतर हा जोम टिकविता आला नाही.

तिसऱया स्थानावर बढती मिळालेल्या रिचा घोषने सफाईदार फटकेबाजी करीत 19 चेंडूत 5 चौकार, 1 षटकारासह 33 धावा फटकावल्या. शफाली 19 व्या षटकात बाद झाल्यानंतर नुर दानिया सयुहादाने पुढच्याच चेंडूव्र किरण नवगिरेला शून्यावर बाद केले. रिचा घोषचा 31 वर असताना झेल सोडल्यामुळे नुरला तिसरा बळी मिळू शकला नाही. कठीण आव्हानाचा पाठलाग करताना दीप्ती शर्मा व राजेश्वरी गायकवाड या स्पिनर्सनी मलेशियाच्या सलामीवीरांना बाद केल्यानंतर पावसास सुरुवात झाली आणि नंतर खेळ होऊ शकला नाही.

संक्षिप्त धावफलक : भारतीय महिला 20 षटकांत 4 बाद 181 : एस.मेघना 69 (53 चेंडूत 11 चौकार, 1 षटकार), शफाली वर्मा 46 (39 चेंडूत 1 चौकार, 3 षटकार), रिचा घोष 33 (19 चेंडूत 5 चौकार, 1 षटकार), किरण नवगिरे 0, राधा यादव 8, डी.हेमलता नाबाद 10, अवांतर 15. गोलंदाजी : दुरायसिंगम 2-36, नुर दानिया सयुहादा 2-9. मलेशियन महिला 5.2 षटकांत 2 बाद 16 : दुरायसिंगम 0, वान ज्युलिया 1, मास एलीसा नाबाद 14, हंटर नाबाद 1. गोलंदाजी : दीप्ती शर्मा 1-10, गायकवाड 1-6.

Related Stories

विंडीज संघाकडून हॉलंडचा ‘व्हाईटवॉश’

Patil_p

गांगुलीच्या रक्ताचा अहवाल समाधानकारक

Patil_p

राष्ट्रीय कुस्ती शिबिर ऑगस्टच्या पहिल्या आठवडय़ात

Patil_p

हॉकी इंडियाची बैठक 13 मे रोजी

Patil_p

ऑस्ट्रेलियाचा द. आफ्रिकेला धक्का

Patil_p

टिम इंडियाचा ‘सुपर विजय’, मालिकाही खिशात

prashant_c
error: Content is protected !!