Tarun Bharat

भारतीय महिलांना कांस्यपदक

Advertisements

चीनवर 2-0 गोलफरकाने विजय

वृत्तसंस्था/ मस्कत

विद्यमान विजेत्या भारतीय महिला हॉकी संघाने चीनचा 2-0 असा पराभव करून महिलांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत कांस्यपदक मिळविले.

कोरियाकडून उपांत्य फेरीत झालेला पराभव मागे टाकत या सामन्यातील पहिल्या दोन सत्रावर वर्चस्व राखत भारताने दोन गोलही नोंदवले. पण उत्तरार्धात भारताला आणखी गोलांची भर घालता आली नाही. पहिला गोल पेनल्टी कॉर्नवर शर्मिला देवीने 13 व्या मिनिटाला नोंदवला. गुरजित कौरने प्रथम मारलेली फ्लिक चिनी बचावफळीने अडवल्यानंतर रिबाऊंड झालेल्या चेंडूवर ताबा घेत शर्मिलाने हा गोल केला. दुसऱया सत्रातील 19 व्या मिनिटाला मिळालेल्या आणखी एका पेनल्टी कॉर्नरवर ड्रगफ्लिकवर गुरजित कौरने अचूक गोल नोंदवत भारताची आघाडी 2-0 अशी केली. चीनने यावेळी प्रत्युत्तर देत पेनल्टी कॉर्नर मिळविला. पण भारतीय कर्णधार व गोलरक्षक सविता पुनियाने अचूक बचाव करीत हा गोल वाचवला. तिसऱया व चौथ्या सत्रात चीनने खेळ उंचावत भारतावर दडपण आणले. पण भारतीय बचावफळीने उत्तम काम केल्याने चीनला गोल करण्यात यश आले नाही.

Related Stories

नॉर्वेचा कास्पर रुड विजेता

Patil_p

ऑस्ट्रेलियाचा न्यूझीलंडवर मोठा विजय

Patil_p

पॅरालिम्पिक समितीकडून 500 सुरक्षा किटस्ची मदत

Patil_p

गयाना अमेझॉनचा बार्बाडोसवर विजय

Patil_p

आठव्या फेरीत आनंद पुन्हा पराभूत

Patil_p

न्यूझीलंडच्या तिघांना कोरोनाची बाधा

Patil_p
error: Content is protected !!