Tarun Bharat

भारतीय महिला क्रिकेट संघाची घोषणा

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

यजमान भारत आणि ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघातील पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी भारतीय महिला क्रिकेट संघाची घोषणा करण्यात आली. या संघाचे नेतृत्व हरमनप्रित कौरकडे सोपविण्यात आले आहे. मात्र, दुखापतीमुळे या मालिकेत अष्टपैलू पूजा वस्त्रकर उपलब्ध होऊ शकणार नाही. भारतीय संघात डावखुरी वेगवान गोलंदाज अंजली सर्वानी हा नवा चेहरा राहील.

उभय संघातील या टी-20 मालिकेला मुंबईत 9 डिसेंबरपासून प्रारंभ होईल. रायपूर येथे झालेल्या महिलांच्या टी-20 चॅलेंजर क्रिकेट स्पर्धेत भारत क संघाचे प्रतिनिधित्व करतान पूजा वस्त्रकरला दुखापत झाली होती. तिची ही दुखापत पूर्णपणे बरी झाली नसल्याने तिला संघातून वगळण्यात आल्याची माहिती बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी दिली आहे. आंध्रप्रदेशची 25 वषीय वेगवान गोलंदाज अंजली सर्वानीची पहिल्यांदाच निवड करण्यात आली आहे. या मालिकेसाठी महाराष्ट्राची अष्टपैलू देविका वैद्यचे संघात पुनरागमन झाले आहे. स्मृती मंदानाकडे उपकर्णधारपद राहील. या मालिकेतील पहिले दोन सामने नव्या मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमवर 9 आणि 11 डिसेंबरला तर त्यानंतर शेवटचे तीन सामने मुंबईत 14, 17 आणि 20 डिसेंबरला खेळविले जातील.

भारतीय महिला संघ- हरमनप्रित कौर (कर्णधार), स्मृती मंदाना (उपकर्णधार), शेफाली वर्मा, यास्तिका भाटिया, जेमिमा रॉड्रीग्ज, दीप्ती शर्मा, राधा यादव, राजेश्वरी गायकवाड, रेणुका सिंग ठाकुर, मेघना सिंग, अंजली सर्वानी, देविका वैद्य, एस. मेघना, रिचा घोष आणि हर्लिन देवोल.

Related Stories

बूम बूम गोलंदाजीसाठी बुमराह सज्ज

Patil_p

एफ-वनचे ‘सेफ्टी इंजिनियरिंग’!

Patil_p

प्रशिक्षक फ्लेमिंग न्यूझीलंड पथकात दाखल

Patil_p

भारत-ऑस्ट्रेलिया यांचे 3 टी-20 सामने सप्टेंबरमध्ये

Patil_p

जेतेपदासाठी बायर्नला एका विजयाची गरज

Patil_p

पाक संघातून हाफीज, फक्रला डच्चू

Patil_p